Devotees gather for Lalbaugcha Raja darshan in Mumbai during Ganesh festival amid heavy crowds. Sarkarnama
मुंबई

Lalbaugcha Raja crowd : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला; दर्शन रांगेत श्वास घेण्यास त्रास झाला अन्...

Pune Youth Dies in Mumbai : जयदीप नेमाडे आपल्या मित्रांसोबत लालबाग परिसरातील बिल्डिंग क्रमांक 3 येथे थांबला होता. यावेळी अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याची प्रकृती बिघडली. जयदीपची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.

Jagdish Patil

Mumbai News, 20 Sep : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सध्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीमुळे परिसरातील वाहतूक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुण्याहून मुंबईत आलेल्या 25 वर्षीय तरुणाची अचानक प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना 17 सप्टेंबर 2026 रोजी रात्री घडली. जयदीप मेघराज नेमाडे (वय 25) असे मृत भाविकाचे नाव आहे. तो पुण्यातील बावधन येथील रहिवासी होता.

जयदीप आपल्या मित्रांसोबत लालबाग परिसरातील बिल्डिंग क्रमांक 3 येथे थांबला होता. यावेळी अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याची प्रकृती बिघडली. जयदीपची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.

त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले; मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री सुमारे 11.40 वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

दर्शनाच्या रांगेत प्रकृती बिघडली

जयदीप दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या मित्रांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला होता. 17 सप्टेंबर रोजी दर्शनासाठी रांगेत उभा असताना त्याला अचानक त्रास जाणवू लागला. त्याला श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यानंतर त्याची प्रकृती अधिकच खालावली आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

जयदीप हा मुळचा जळगावचा असून नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक मेघराज सुभाष नेमाडे यांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याने मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर MBA केले होते. त्यानंतर तो पुण्यात नोकरी करत होता. जयदीपच्या आईचे 12 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबात आता त्याचे वडील मेघराज नेमाडे हेच आहेत. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने नेमाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT