Government officials face investigation after a ₹1000 crore land scam surfaces, with FIR registered against Hemant Patil and Dharmesh Shah Sarkarnama
मुंबई

Government Land Scam: तब्बल एक हजार कोटींचा जमीन घोटाळा, शासकीय अधिकारी गोत्यात;  हेमंत पाटील, धर्मेश शहांवर गुन्हा दाखल

1000 Crore Land Fraud Maharashtra : खोट्या कागदपत्रांच्या आधारे तब्बल 66 हजार जमीन विकून एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदिप पंडित

Land Scam News: पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील टिवरी भागात एक हजार कोटींचा जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी खोटी कागदपत्रे सादर करत जमीन विक्री करण्यासंदर्भात नायगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने हा घोटाळा केल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. या प्रकरणी हेमंत पाटील, धर्मेश शहा, दिपक खोचरे, मच्छिंद्र भोईर आणि इतर साथीदारांविरुद्ध नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम व्यावसायिक शंकरराव बोरकर यांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार, सन २००८ पासून आरोपी हेमंत पाटील आणि धर्मेश शहा यांनी त्यांचा विश्वास संपादन केला होता. मात्र, नायगाव (पूर्व) येथील मौजे टिवरी येथील 65.33 एकर जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून ती बेकायदेशीररीत्या विकली.

बोरकर यांच्या तक्रारीनुसार जमिनीचे रितसर 7/12 उतारे, नोंदणीकृत खरेदीखत आणि साठेकरार अस्तित्वात होते. या गुन्ह्यात कालबाह्य आणि रद्द झालेल्या ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’चा वापर करण्यात आला. बिगर-नोंदणीकृत कागदपत्रांच्या आधारे अनेक सर्व्हे नंबरच्या जमिनी परस्पर विकल्या गेल्या. तसेच यासाठी त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनीच मदत केली.

वसई-२ निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी, तत्कालीन तहसीलदार आणि तलाठ्यांनी महसुली नियमांचे उल्लंघन करून आरोपींना मोठी मदत केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT