

Maharashtra Rajya Sabha Election 2026: महाविकास आघाडीला मोठा संकटाचा सामाना करावा लागणार आहे. विधानसभेत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आता थेट तीन खासदारकीच्या जागा त्यांना गमवाव्या लागू शकतात.
राज्यसभेतील राज्याच्या सात जागा रिक्त होत आहे. त्यामध्ये चार जागा या महाविकास आघाडीकडे होत्या. मात्र, विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे त्यांना आता फक्त एकचा जागेवर विजय मिळवता येणार आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्यसभेतून निवृत्त होणार आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसच्य रजनी पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या फौजिया खान हे देखील निवृत्त होत आहे. तर, महायुतीमधील मंत्री रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील, हे निवृत्त होत आहे.
महाविकास आघाडीचे चार खासदार 2020 मध्ये राज्यसभेवर विजयी झाले होते. मात्र, आता फक्त महाविकास आघाडी एकत्र राहिली तर त्यांचा एकच खासदार राज्यसभेवर जाऊ शकतो. तर, महायुतीचे सहा खासदार विजयी होऊ शकतात.
शरद पवार हे राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे ते पुन्हा राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार की नाही याचा निर्णय तेच घेणार आहेत. महाविकास आघाडीतून केवळ एक उमदेवार विजयी होऊ शकतो त्यामुळे शरद पवार यांचेच नाव आघाडीवर असणार आहे.
राज्यसभेच्या उमेदवारांसाठी विधानसभेतील आमदार मतदान करणार आहेत. उमेदवाराला विजयी होण्यासाठी 37 मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे 16, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे संख्याबळ 46 होते. त्यामुळे आघाडीचा केवळ एक खासदार विजयी होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.