Mayor Elections 2026 : भाजपसाठी 'ऑल सेट'! 6 हजार कोटींच्या तिजोरीच्या चाव्या आजपासून भाजपच्या हाती!

BJP Wins Nashik Jalgaon Dhule: नाशिकसाठी हिमगौरी आडके आणि मच्छिंद्र सानप महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. धुळे येथे महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौरपदासाठी ज्योत्स्ना पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. जळगाव महापालिकेत दीपमाला काळे या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार आहे.
Newly elected BJP mayors in Nashik, Jalgaon and Dhule prepare to assume office, marking the party’s return to power in key municipal corporations.
Newly elected BJP mayors in Nashik, Jalgaon and Dhule prepare to assume office, marking the party’s return to power in key municipal corporations.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 06 Feb : नाशिक, जळगाव आणि धुळे महापालिकेत भाजपचे महापौर निश्चित झाले आहेत. हिमगौरी आडके, दीपमला काळे आणि मायादेवी परदेशी यांच्या महापौरपदाची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. या निमित्ताने नाशिक, जळगाव आणि धुळे या तिन्ही महापालिकांवर भाजप पूर्ण बहुमताने सत्तेवर येणार आहे.

नाशिक धुळे आणि जळगाव या तिन्ही महापालिकांच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठीची महासभा आज दुपारी एक वाजता होणार आहे. या तिन्ही ठिकाणी भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आहे. जळगाव महापालिकेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या 22 नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा आहे.

नाशिकसाठी हिमगौरी आडके आणि मच्छिंद्र सानप महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. धुळे येथे महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौरपदासाठी ज्योत्स्ना पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. जळगाव महापालिकेत दीपमाला काळे या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने मनोज चौधरी यांना उपमहापौर पदाचे संधी दिली आहे. या तिन्ही ठिकाणी भाजप चार वर्षानंतर सत्तेत येत आहे. नाशिक महापालिकेची 4000 कोटी तर धुळे आणि जळगावचा दोन हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे. चार वर्षांनी भाजप पुन्हा एकदा 6000 कोटींच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात घेईल.

Newly elected BJP mayors in Nashik, Jalgaon and Dhule prepare to assume office, marking the party’s return to power in key municipal corporations.
Meghalaya Coal Mine Blast: मेघालयमध्ये कोळसा खाणीत भीषण स्फोट! 18 कामगारांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

नाशिक महापालिकेसाठी भाजपला स्वबळावर सत्ता विशेष महत्त्वाची आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यावर राज्य शासनाकडून सुमारे तीस हजार कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. हा निधी प्रामुख्याने शहराबाहेरील पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे. त्यावर राज्य शासनाचे संपूर्ण नियंत्रण आहे.

सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून सिंहस्थ कुंभमेळा आणि कामांची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली आहे. शहरातील स्व पक्षाच्या आमदारांसह महाविकास आघाडीच्या खासदारांनाही या बैठकांना निमंत्रित केले जात नाही. या पार्श्वभूमीवर भाजपसाठी नाशिकच्या आर्थिक जाव्या पुन्हा एकदा हाती येणे विशेष महत्त्वाचे आहे.

Newly elected BJP mayors in Nashik, Jalgaon and Dhule prepare to assume office, marking the party’s return to power in key municipal corporations.
Ajit Pawar Death : 'अजितदादांच्या निधनानंतर लगेच तटकरेंचं गलिच्छ राजकारण, पवारसाहेब सुनेत्रावहिनींना...', रामदास कदमांचा गंभीर आरोप

गेल्या महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये अनपेक्षित पणे भाजपने बहुतांशी जागा निवडून आणल्या. त्यासाठी जळगावला आमदार राजू मामा भोळे आणि मंगेश चव्हाण, धुळे महापालिकेत सूत्रे आमदार अनुप अग्रवाल तर नाशिक पूर्णपणे मंत्री महाजन यांच्याकडे होते. भाजपने धुळे शहरात स्वबळावर 50 जागा जिंकले आहेत. अँटी इन्कमबन्सी हा मोठा फॅक्टर धुळे महापालिकेत होता.

भाजपच्या कारभारावर नागरिक नाखुश होते. त्यामुळे सर्व 31 नगरसेवकांना उमेदवारी नाकारून भाजपने नवा प्रयोग केला होता. तो प्रयोग यशस्वी झाला. नाशिक धुळे आणि जळगाव या तिन्ही महापालिकेत आज महिला महापौर सूत्रे स्वीकारतील. पुढील आठवड्यात स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आज पासून उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचे नियंत्रण प्रस्थापित होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com