Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Video Eknath Shinde On OBC : सरकारच्या धावपळीला यश, हाकेंचं उपोषण स्थगित, पण लढा सुरुच राहणार; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी १३ जुलैपर्यंत मुदत दिली. त्यानंतर सरकारच्या हालचालीनंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली.

त्यातून ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केले. आता ओबीसी आंदोलकांनी सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर उपोषण मागे घेतले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे धन्यवाद मानले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde म्हणाले, मराठा समाजानंतर राज्यात ओबीसी समाजाचे उपोषण सुरू झाले. त्याबाबत ओबीसी नेत्यांशी शुक्रवारी चर्चा झाली. त्यावेळी राज्यातील दोन समाजात तेढ होऊ नये, कुणत्याही समाजावर अन्याय होऊ नये, त्यातून मार्ग कसा काढायचा यावर सकारात्मक चर्चा झाली. त्यातून नेमलेल्या शिष्टमंडळाने आज ओबीसी आंदोलकांशी बोलणी केली. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.

दरम्यान, ओबीसी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. कोणालाही कुणबी म्हणून खोटी सर्टिफिकेट मिळणार नाही. तसे झाले तर देणार आणि घेणारे दोघांवरही कारवाई करण्यात येणार आहे. आरक्षणाचा योग्य लाभ घेण्यासाठी आणि सरकारची फसवणूक टाळण्यासाठी जात प्रमाणपत्र आधार कार्डशी जोडण्यात येणार आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात मराठा समजाच्या असणाऱ्या समस्या सोडवणारी समिती आहे. त्याच धर्तीवर आता ओबीसींच्या OBC समस्या सोडवण्यासाठीही समिती नेमण्यात येणार आहे. अधिवेशन काळात सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन या आरक्षणाबाबत चर्चा करणार आहोत, असाही निर्णय घेण्यात आला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT