Devendra Fadnavis, Kirit Somaiya sarkarnama
मुंबई

फडणवीसांची भेट घेताच सोमय्यांनी ठाकरे सरकारला पुन्हा डिवचले!

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची भेट घेतली.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची भेट घेतली. या दोघांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली. गेले काही दिवस सोमय्या हे शिवसेनेवर (shivsena) तुटून पडत आहेत. शिवसेनाही त्यांना तसेच प्रत्युत्तर देत आहे. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सोमय्या यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला.

आज मुंबई आणि ठाण्यात शिवजयंतीनिमित्त फडणवीस हे विविध कार्यक्रमांना हजर होते. या वेळी त्यांनी सोमय्या यांची भेट घेतली. सोमय्या यांनी शुक्रवारी कोलई येथे भेट दिली होती. त्या ठिकाणी सोमय्या यांच्या भेटीवेळी भाजप (BJP) आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्या पार्श्वभूमिवर फडणवीस सोमय्या भेटीला महत्त्व आले होते.

फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, देवेंद्र फडणवीस मला भेटण्यासाठी आले होते. आमच्या दोघांमध्ये पुढील रणनिती संदर्भात चर्चा झाली. भाजप तुमच्या पाठीशी 100% उभा आहे, तुम्ही काळजी करण्याच कारण नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. येत्या काळात आणखी काही प्रकरणे बाहेर काढली जाणार आहेत, असेही सोमय्या म्हणाले. यानंतर तुमचा निशाणा कोणत्या पक्षावर असणार असे विचारले असता सोमय्या म्हणाले, 'आगे-आगे देखो होता हे क्या?'

राज्यातील संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे. महाराष्ट्र आपल्याला घोटाळे मुक्त करायचा आहे, असेही फडणवीसांनी सांगितल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. फडणवीस यांच्यासोबत घोटाळ्यांसंबधी चर्चा झाली. याशिवाय गेले काही दिवस माझ्यावर ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत त्यावरही चर्चा झाली. पुण्यानंतर काल कोरलईला देखील अधिकृत वेळ घेऊन गेलेलो असताना देखील शिवसेनेचे गुंड तिथे पोहचली कशी? त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी चिंता व्यक्त केली, असेही सोमय्या म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT