Neelam Gorhe On Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Neelam Gorhe On Sanjay Raut: ...यात संजय राऊतांचा नाहक बळी गेला; नीलम गोऱ्हे यांचे विधान चर्चेत

Shivsena : नीलम गोऱ्हे यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा

सरकारनामा ब्यूरो

Political News: विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करत शिंदेंच्या शिवसेनेत 7 जुलैला जाहीर प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. मात्र, शिवसेनेच्या रणरागिनी अशी ओळख असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी का दिली? याचे कारण समोर आलं नव्हतं. पण आता त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे.

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर चर्चेचे दार बंद झाले होते. लोकांची अपेक्षा होती तेवढा वेळ उद्धव ठाकरे देत नव्हते. त्यामुळे ठाकरे गटात संवादाचा अभाव आहे", असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे. याचवेळी नीलम गोऱ्हे यांनी संजय राऊत यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्याची सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

"संजय राऊत हे त्यांना जे सांगितलं जातं तेच ते बोलतात. यात त्यांचा नाहक बळी गेला", असं विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "संजय राऊत यांनी मला खूप मदत केलेली आहे. माझ्या आमदारकीच्या वेळी त्यांनी खूप मदत केली. तसेच त्यांचे लिखाण खूप उत्तम आहे. मात्र, संजय राऊत जे काही बोलतात ते त्यांना जे सांगितलं जातं तेच ते बोलतात.

आक्रमक बोलायचं नाही पण आक्रमक बोलणारा माणूस त्यांना पाहिजे, त्यामुळे संजय राऊतांना देखील याचा खूप त्रास झाला. या सगळ्यात संजय राऊतांचा काही प्रमाणात बळी गेला आहे, असं मला वाटतं", असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, "कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन मी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केलेला नाही", असं स्पष्टीकरणही यावेळी नीलम गोऱ्हे यांनी दिलं. याबरोबरच त्यांनी शिवसेनेसह सध्याच्या राजकीय घडामोडींबाबतही त्यांनी भाष्य केलं.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT