Ajit pawar
Ajit pawar Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : अजितदादांना 'या' मतदारसंघात घड्याळ वापरता येणार नाही; स्कूटर चिन्हाची मागणी...

Chetan Zadpe

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह लक्षद्विपच्या निवडणुकीत वापरता येणार नाही. कारण अर्ज दाखल करायला उशीर झाला आणि दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवा, असा आदेश अजित पवार गट यांना देण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून आता स्कूटर या चिन्हासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा यापूर्वीच गेला होता. त्यानंतर महाराष्ट्र आणि नागालँड या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला प्रादेशिक पक्षाची मान्यता होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह, निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिले आहे.

एखाद्या प्रादेशिक पक्षाला देशभर एकच चिन्ह वापरायचे असेल तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत अर्ज दाखल करावा लागतो. परंतु असा अर्ज अजित पवार गटाकडून 24 मार्च रोजी दाखल केला गेला. मात्र, निवडणूक आयोगाचे नोटिफिकेशन जाहीर होऊन तीन दिवस उलटून गेले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामुळे आता पहिल्या टप्प्याचे नोटिफिकेशन 20 मार्चला निघाले. त्यामुळे अर्ज दाखल करायला राष्ट्रवादीला उशीर झाला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या निवडणुकांमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांना घड्याळ हे चिन्ह संपूर्ण देशभर वापरता येणार नाही.

यामुळे पहिल्या टप्प्यात लक्षद्विपच्या निवडणुका आहेत. तिथे राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवाराला भाजपने पाठिंबा दिला आहे आणि ते एनडीएचे उमेदवार म्हणून तिथून निवडणूक लढत आहेत. परंतु आता तांत्रिक अडचणीमुळे त्यांना त्या ठिकाणी घड्याळ हे चिन्ह वापरता येणार नाही. या ठिकाणी राष्ट्रवादीने स्कूटर चिन्हाची मागणी केली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT