eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : प्रचार नक्की करू, पण कुणाचा ते तरी सांगा! संभ्रमाच्या भोवऱ्यात कार्यकर्ते

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी ( Lok Sabha Election 2024 ) केवळ दोन मतदारसंघांतील उमेदवार प्रमुख पक्षांनी जाहीर केले आहेत. यामुळे निवडणूक प्रचाराला अजून रंग चढलेला नाही; मात्र बऱ्याचदा बैठका आणि चर्चा होऊनदेखील उमेदवार ठरत नसल्याने स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळाचे चित्र आहे. आघाड्या आणि महायुत्यांमध्ये अनेक पक्ष असल्याने नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार, हे जाहीर नसल्याने कार्यकर्त्यांनादेखील सबुरीने घेण्याची वेळ आली आहे.

मुंबई महानगरातील मतदान प्रक्रिया ही शेवटच्या टप्प्यात होत असल्याने राजकीय पक्ष्यांच्या हातात वेळ आहे. त्यामुळे उमेदवारांची घोषणा करण्यासाठी वेळ घेत आहेत. काही पक्षांकडून घोषणा झाली असल्यामुळे त्यांनी आपला प्रचार सध्या सुरू केला आहे; तर दुसरीकडे मात्र उमेदवारी निश्चित नसल्यामुळे कार्यकर्तेही अजून शांत असल्याचे दिसते आहे.

दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ ( Lok Sabha Election 2024 ) सोडले, तर मुंबईतील इतर चार मतदारसंघांत अजूनही राजकीय संभ्रम आहे. अजूनही या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार निश्चित झाले नाहीत. यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटाचे राहुल शेवाळे ( Rahul Shewale ); तर ठाकरे गटाचे अनिल देसाई ( Anil Desai ) यांना मैदानात उतरवण्यात आले आहे; तर ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील ( Sanjay Dina Patil ) आणि भाजपचे मिहीर कोटेचा ( Mihir Koteja ) रिंगणात आहेत. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत ( Arvind Sawant ) यांनी आपल्या प्रचारावर जोर दिला आहे; तर उत्तर मुंबईत भाजपचे पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली असून त्यांनीही आपला प्रचार जोरदारपणे राबवला आहे.

काही मतदारसंघामध्ये संभावित नावे चर्चेत आहेत, त्यामुळे कोणत्याही हालचाली नाहीत. अतिघाई केली तर पक्षाकडून तिकीट कापले जाण्याची भीतीदेखील त्यांना आहे. यामुळे अशा नेत्यांनी आपल्या खंद्या समर्थकांनाही शांत राहण्याचे निर्देश दिले आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT