Kolhapur Loksabha News : सदाभाऊ म्हणतात, सत्ता ही वाईट; मंत्रिपद गेलं की कोणी फोनही उचलत नाही...

Sadabhau Khot सदाभाऊ खोत यांना सेना-भाजप सरकाच्या काळात राज्यमंत्रिपदी संधी मिळाली. पण, महायुती सरकारच्या काळात सदाभाऊंना कोणतेच पद मिळाले नाही.
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama
Published on
Updated on

kolhapur News : सत्ता ही वाईट असते ती मी भोगली आहे. प्रत्येक तालुक्यात एक किलोमीटर रांगा लागायच्या. मला वाटायचं आपलं वजन वाढायला लागलाय. पण, मंत्रिपद गेलं, गाडी बी गेली आणि गाडीवालाही गेला. मी एकटाच राहिलो आहे. आधी मला एक एक वाजेपर्यंत फोन करायचे, मी उचलायचो. मात्र, आता मी फोन केला तर गडी फोनही उचलत नाहीत, अशी खंत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.

सदाभाऊ खोत यांना सेना-भाजप सरकाच्या काळात राज्यमंत्रिपदी संधी मिळाली. पण, महायुती सरकारच्या काळात सदाभाऊंना कोणतेच पद मिळाले नाही. त्यांना हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढायची होती, पण ही जागा महायुतीत शिंदे गट शिवसेनेला सुटली. त्यामुळे धैर्यशील माने यांना उमदेवारी दिली गेली. त्यामुळे लोकसभा लढविण्याची संधी त्यांना मिळाली नाही. याची खंत त्यांनी कोल्हापुरातील सभेत बोलून दाखवली.

सदाभाऊ म्हणाले, माझं मंत्रिपद गेल्यानंतर एकाही खासदाराने गाडीची काच खाली केली नाही. मी मंत्री असताना ते घरी आले की, मी त्यांना सोलापुरी भाकरी ठेचा, शेंगा चटणी द्यायचो. गडी खाताना म्हणायचा मंत्री बघितलं पण, तुमच्यासारखा माणूस नाही. खाणारा गडी खाऊन थकून जायचा. मात्र, मी सांगायचो त्यांना खाऊ घाला थोडे कामाला येतात.

Sadabhau Khot
Sadabhau Khot News : "एकलव्यानं 1 अंगठा दिला, फडणवीसांसाठी मी 2 अंगठे देण्यास तयार", खोतांचं विधान

पण, आता कुठे कोण आहे. पूर्वी जेवायला बोलवायचे मात्र आता साधा चहा प्यायलादेखील कोणी बोलवत नाहीत, अशीही खंत खोत यांनी व्यक्त केली. बोलण्यात कधी हायगय करायची नाही. मी बोलतच होतो की हातकणंगले मीच लढवणार आहे. मी नाही म्हणलं तर माणसं माझ्यासोबत राहतील का, असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.

लोक विचारायचे भाऊ कसं काय, मी म्हणायचो जमलं, पण मला माहीत होतं जमलेला नाही. सत्ता ही वाईट असते ती मी भोगली आहे. प्रत्येक तालुक्यात एक किलोमीटर रांगा लागायच्या. मला वाटायचं आपलं वजन वाढायला लागलाय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sadabhau Khot
SadaBhau Khot News : सदाभाऊ खोतांनी केली भाजपची गोची? धैर्यशील मानेंसमोरच केलं मोठं विधान

मात्र, मंत्रिपद गेलं आणि गाडी बी गेली आणि गाडीवालाही गेला. मी एकटाच राहिल्याचे खोत या वेळी म्हणाले. आधी मला एक एक वाजेपर्यंत फोन करायचे, मी उचलायचो, मात्र आता मी फोन केला तर गडीही फोन उचलत नाही, असेही ते म्हणाले.

Edited By : Umesh Bambare

R

Sadabhau Khot
Sunil Chavan Join BJP: धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com