Loksabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात ‘इंडिया’ आघाडीचे पारडे जड; उत्तर प्रदेशात भाजपपुढे अडचण...

India Alliance पहिल्या टप्प्यातील आठ जागांवर विजयाची अपेक्षा बाळगणाऱ्या भाजपसह आणि इंडिया आघाडीलाही या जागांवर प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे.
Bjp v/s India Alliance
Bjp v/s India Alliancesarkarnama
Published on
Updated on

- शरत प्रधान

Uttar Pardesh Loksabha News : उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील ज्या आठ जागांवर आज मतदान झाले, त्यापैकी सर्व जागांवर २०१४ मध्ये भाजपने विजय मिळविला होता. तर मागील निवडणुकीमध्ये भाजपला यापैकी पाच जागांवरच वियज मिळविणे शक्य होऊ शकले होते. यंदाच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे पाहता, या वेळीही भाजपपेक्षा विरोधकांच्या इंडिया आघाडीचेच पारडे येथे जड वाटत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपने २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापूर्वीच उत्तर प्रदेशात सर्व जागांवर भाजपला विजय मिळेल, असा दावा करायला सुरुवात केली होती. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात आम्ही ८० पैकी ८० जागांवर विजय मिळवू, असा दावा अमित शाह यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार करण्यात येत होता.

चुकीच्या मुद्द्यांच्या आधारे समाजाची एक विशिष्ट भूमिका तयार करण्याचा प्रयत्न करायचा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुभवसिद्ध धोरणाचे प्रतिबिंब या दाव्यांमध्ये दिसत होते. अशातच विरोधकांच्या आघाडीतील मतभेदांमुळे, तर भाजपकडून करण्यात येत असणाऱ्या दाव्यांना अधिकच बळ मिळत होते. परंतु जशी लोकसभा निवडणुकीची वेळ जवळ येत गेली तसतसे पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान झाले, त्या जागांपैकी अधिकाधिक जागांवर विजय मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश पक्षाच्या नेतृत्वाकडून देण्यात आले होते.

Bjp v/s India Alliance
Uttar Pradesh Politics: मुस्लिम मतांचे विभाजन करून भाजपला पुन्हा एकहाती सत्ता मिळेल का?

मात्र, वस्तुस्थिती पाहता पहिल्या टप्प्यातील आठ जागांवर विजयाची अपेक्षा बाळगणाऱ्या भाजपसह आणि इंडिया आघाडीलाही या जागांवर प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. २०१४मध्ये जेव्हा भाजपने उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७१ जागांवर विजय मिळवला होता, त्यावेळी या आठही जागांवर पक्षाला विजय मिळाला होता. मात्र, २०१९मध्ये यापैकी पाच जागांवर पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीमध्ये येथील समीकरणे बदलली आहेत.

सीबीआयची टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे मायावती यांनी तडजोड केल्याचे दिसत आहे. तर, राष्ट्रीय लोक दलानेही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभाग घ्यायचा निर्णय घेतला आहे. मायावती यांनी ‘एकला चलो रे’चा दिलेली नारा आणि पहिल्या टप्प्यातील आठपैकी तीन जागांवर मुस्लिम उमेदवार देत मुस्लिम मतांचे विभाजन होऊन भाजपला फायदा होईल याची काळजी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Bjp v/s India Alliance
BJP Manifesto 2024 : भाजपचा जाहीरनामा अन् मोदींच्या भाषणातून ‘हे’ दोन शब्द गायब!

बदललेली समीकरणे

मागील निवडणुकीमध्ये भाजपने पिलिभित येथे वरुण गांधी यांच्या वैयक्तिक संपर्कामुळे आणि लोकप्रियतेमुळे येथे विजय मिळविला होता. मात्र, त्यांनी स्पष्टवक्तेपणातून आर्थिक धोरणाबाबत व्यक्त केलेली मते त्यांच्या पक्षाच्या अनुदार धोरणाला न रुचल्याने त्यांना यंदा उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार जितन प्रसाद यांना निवडणुकीमध्ये विजय मिळविणे कठीण असल्याचे स्थानिक पत्रकारांचे म्हणणे आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे जितनप्रसाद निवडून येणार, असा आत्मविश्‍वास भाजपमधील स्थानिक नेत्यांमध्ये दिसून येत आहे.

Bjp v/s India Alliance
Narendra Modi News : काँग्रेसच्या युवराजांवर आरोप ते गॅरंटी ही तीन अक्षरांचा खेळ नाही; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख दहा मुद्दे..!

सहारनपूर येथे बहुजन समाज पक्ष, भाजप यांच्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. पहिल्या टप्प्यातील हा एकमेव मतदारसंघ होता जिथे काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. येथे भाजपने राघवलाल लखनपाल यांना तर बसपने माजीद अली यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसने येथून इम्रान मसूद यांना रिंगणात उतरविले आहे. आझमगड हा मतदारसंघ समाजवादी पक्षाचा मुस्लिम चेहरा असलेल्या आझम खान यांच्यामुळे कायमच चर्चेत राहिला आहे.

Bjp v/s India Alliance
Uttar Pradesh : धक्कादायक : मतपेट्यांवर पाणी अन् तेजाब टाकल्याने नवा वाद ; ८० जणांवर गुन्हा दाखल..

समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात अखिलेश यांनी यंदा मूळचे दिल्लीचे असलेले इमाम मोईतुल्ला नदवी यांना उमेदवरी दिली आहे, तर भाजपने येथून २०२२मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले घनश्‍याम लोधी यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर बसपचे झिशान अली हे प्रचारादरम्यान त्यांच्या ठराविक मतदारांपलीकडे अन्य कोठेही फार प्रचार करताना दिसले नाहीत. मुझफ्फरनगर, पिलिभित आणि कैराना या जागांवर भाजप पुन्हा आपले वर्चस्व मिळविण्यात यश मिळाले तरी, अन्य पाच जागांवरील निवडणूक भाजपसाठी तितकी सोपी नाही.

Bjp v/s India Alliance
India Alliance News : काश्मीरमध्ये इंडिया आघाडी तुटली? तीनही जागांवर मेहबूबा मुफ्ती उमेदवार उतरवणार?

मुरादाबादमध्ये भाजपला संधी?

मुरादाबादमधील समाजवादी पक्षाचे खासदार एपी हसन यांच्याऐवजी येथून आझमखान यांच्या निकटवर्तीय रुची वेरा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हसन समर्थ नाराज असल्याचे मानले जात असून, भाजपचे उमेदवार सर्वेश कुमार यांना येथे विजयाची संधी असल्याचे स्थानिक पत्रकारांचे म्हणणे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bjp v/s India Alliance
Rahul Gandhi News : राहुल गांधींसोबत लग्न का नाही झाले? अदिती सिंहांनी दिलं उत्तर

आझाद यांचे आव्हान

दलितांचा बुलंद आवाज म्हणून उदयास आलेले चंद्रशेखर आझाद यांनी नगिना येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने येथील समीकरणे बदलू शकतात. त्यांना ‘इंडिया’ आघाडीमध्ये समाविष्ट करण्यात आले असते तर त्याचा इंडिया आघाडीला नक्कीच फायदा झाला असता, असे मानले जाते.

या मतदारसंघांत झाले मतदान...

पिलिभित, सहारनपूर, कैराना, मुझफ्फरनगर, रामपूर, मुरादाबाद, बिजनोर, नगिना

Edited By : Umesh Bambare

R

Bjp v/s India Alliance
Uttar Pradesh Politics : मोदींना भिडणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या मतदारसंघात 'सपा'ने दिला उमेदवार; 'इंडिया'चं काय होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com