Devendra Fadnavis On Dhairyasheel Mohite Patil
Devendra Fadnavis On Dhairyasheel Mohite Patil sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : "...तर मी सोडणार नाही," फडणवीसांचा धैर्यशील मोहिते-पाटलांना थेट इशारा

Akshay Sabale

माढ्यात ( Madha Lok Sabha Constituency ) धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपशी बंडखोरी करत 'तुतारी' हाती घेतली आहे. तेव्हापासून धैर्यशील मोहिते-पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निशाण्यावर आले आहेत. माळशिरसमध्ये सरंजामशाही कार्यकर्त्यांवर दडपशाहीत परावर्तित होत असेल, तर सोडणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी मोहिते-पाटील यांना दिला आहे. तसेच, गुंडगिरीचं राज्य चालू देणार नाही, असंही फडणवीस यांनी मोहिते-पाटील यांना ठणकावून सांगितलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, "'ज्यांनी विश्वासघात केला, त्यांचा सत्यानाश होईल,' अशी भूमिका यासाठी घेतली की, आमच्या कार्यकर्त्यांना काम करून दिलं जात नाही. भाजपच्या बैठकीला कार्यकर्ते आले, तर फोन करून धमकावलं जातंय. पण, ही लोकशाही आहे. तुम्ही मते मागा, आम्हीही मागतो. जनता कुणाला मत द्यायचा त्याला देईल. पण, ठोकशाही कराल, तर सहन करणार नाही. मी कुणाला दबत नाही आणि दबणारही नाही. अशाप्रकराची ठोकशाही सहन करणार नाही."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"माझ्याशी विश्वासघात केलेल्यांचा सत्यानाश झाला"

"मी राजकारणी नाही. याला पाडा, त्याला पाडा असे छक्केपंजे मी कधीही करत नाही. माझ्याशी विश्वासघात केलेल्यांचा सत्यानाश झाला. कुणाची आधी झाला, कुणाचा नंतर झाला," असं फडणवीसांनी म्हटलं.

"जुन्या काळात केलेली पाप लपवली"

महाशक्तीची सत्ता असताना कार्यकर्त्यांना धमकावलं जातंय? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, "काहींच्या जुन्या सवयी असतात. अजून काही लोकांची सरंजामशाही गेली नाही. लोक आपल्या अधिपत्याखाली आहेत, असं काहींना वाटतं. जुन्या काळात केलेली पाप लपवली आहेत. आम्ही काहीही करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यात आहे."

"गुंडगिरीचं राज्य चालू देणार नाही"

"सरंजामशाही कार्यकर्त्यांवर दडपशाहीत परावर्तित होत असेल, तर मी सोडणार नाही. हे धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांसाठी आहे. थेट गुंडगिरीचं राज्य चालवण्याचा प्रयत्न केला जातो. पण, मी चालू देणार नाही," असं फडणवीसांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT