devendra fadnavis eknath shinde sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : मध्यरात्री तीनपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक, नेमकं काय ठरलं?

Roshan More

Maharashtra Politics : महायुतीतील काही जागांवरील तिढा अजुनही सुटलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठकांचा सीलसीला सुरू आहे. ठाणेच्या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत तर कल्याणची जागा भाजपला सोडा, अशी मागणी भाजपमधून करण्यात येत आहे. त्यासोबत संभाजीनगर, नाशिकच्या जागेवरून महायुतीतला तिढा काही सुटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 'वर्षा'वर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री तीनला संपली.

महायुतीमध्ये तिढा असणाऱ्या जागांवर या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. विशेष ठाणे आणि कल्याणच्या जागे संदर्भात चर्चा झाली असावी. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वर्षावरून गेल्यानंतर दहाच मिनिटांमध्ये श्रीकांत शिंदे यांचे वर्षावर आगमन झाले. ठाणे मतदारसंघ शिंदे गटाला मिळावा येथून श्रीकांत शिंदे उमेदवार असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत या बैठकीला मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते संजय शिरसाठ देखील उपस्थित होते. वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस रात्री 11.30 ला दाखल झाले. त्यानंतर उदय सामंत रात्री 12.15 ला वर्षावर आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते संजय शिरसाठ यांच्यात चर्चा झाली. रात्री तीन वाजता फडणवीस आपल्या सागर निवासस्थानाकडे रवाना झाले.

देवेंद्र फडणवीस वर्षा निवास्थानावरून गेल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्ये श्रीकांत शिंदे यांचे तेथे आगमन झाले. शिवसेनेच्या पहिल्या यादीत श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याणचा समावेश नव्हता. त्यामुळे श्रीकांत शिंदे तेथून लढणार नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ठाणे मतदारसंघातून श्रीकांत शिंदे उमेदवार असण्याच्या चर्चा आहेत. त्याच दृष्टीने बैठीनंतर श्रीकांत शिंदे हे वर्षावर आले असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT