Raju Patil, Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Kalyan Politics : आधी 'पॉकेटमनी'वरून डिवचलं; आता राजू पाटील अन् श्रीकांत शिंदेंचे गळ्यात गळे

Raju Patil Vs Shrikant Patil : विकास कामे, कामांचे श्रेय, राजकीय कुरघोड्या आदींवरून कायमच खासदार शिंदे यांनी राजू पाटलांनी लक्ष केले. खासदार शिंदेही त्यांना सडोतोड प्रत्युत्तर देत राहिले. परिणामी दोघांतील कलह वाढतच गेला.

Sunil Balasaheb Dhumal

Kalyan Political News : शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्य 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत पहायला मिळाले आहे. काही लोक पॉकेटमनी मिळावा म्हणून घरच्याच खात्यातून कामे देतात आणि विकासकामाच्या वलग्ना करतात, अशा शेलक्या शब्दात पाटलांनी शिंदेंचा समाचार घेतला होता. आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वारे फिरले आहे. या उभय नेत्यांतील मैत्री फुलत असून ते एकमेकांचे गोडवे गाताना थकत नसल्याचे दिसून येत आहेत.

कल्याणचे Kalyan खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्यात विविध कारणांवरून कलगीतुरा रंगत होता. 2014 च्या लोकसभेत खासदार शिंदेंनी मनसेचे राजू पाटलांता पराभव करत विजयी झाले होते. यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीणमधून राजू पाटलांनी शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांचा पराभव करत विजय मिळवला. यानंतर विकास कामे, कामांचे श्रेय, राजकीय कुरघोड्या आदींवरून कायमच खासदार शिंदे यांनी राजू पाटलांनी लक्ष केले. खासदार शिंदेही त्यांना सडोतोड प्रत्युत्तर देत राहिले. परिणामी दोघांतील कलह वाढतच गेला.

आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी Raj Thackeray यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर कल्याणमध्ये मनसे पदाधिकारी खासदार शिंदेना पाठिंबा देत आहेत. आत्तापर्यंत ज्यांच्या विरोधात लढत आलो, त्यांच्यासाठी काम कसे करायचे असा प्रश्न मनसे पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे. ही शंका दूर करून खासदार शिंदेंनी आमदार राजू पाटलांच्या मध्यस्थिने डोंबिवलीत मनसेच्या मेळाळा घेण्यात आला. यात उभय नेत्यांनी एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले.

मनसेच्या मेळाव्यात आमदार पाटलांनी Raju Patil मित्र म्हणून संबोधताच खासदार शिंदे यांना हसू अनावर झाले. यावेळी प्रेक्षागृहात एकच टाळ्यांच्या कडकडात झाला. यानंतर शिंदेंनीही आमदार पाटील यांच्या मैत्रीचे स्वागत करत स्वतःही आमदार पाटील यांना माझे मित्र संबोधत मैत्रीचे नाते घट्ट केले आहे. राजू पाटील उभे असल्यावर जसे तुम्ही काम करणार, त्या पद्धतीनेच तुम्हाला खासदार शिंदे यांच्यासाठी काम करायचे आहे. ते काम मतपेटीत दिसले पाहिजे. ते दिसले नाही तर तुमचे आमच्यावरचे प्रेम काही कामाच नाही, असे आवाहन करत आमदार पाटलांनी श्रीकांत शिंदेंसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्यास सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांनी, राजू पाटील यांचे विशेष प्रेम पहिल्यापासूनच आहे. गेल्या दहा वर्षांत एवढ्या गोष्टी होऊनही त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे उदार मनाचे आहेत तसेच संस्कार राजू पाटलांवरही झाले, असे शिंदे म्हणाले. आमच्या वैचारिक मतभेद असतील परंतु वैयक्तिक मतभेद नाहीत. मला खूप आनंद आहे एवढ्या दिवसांत जो दुरावा होता, मतभेद होते ते महायुतीमुळे आता बाजूला झाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता येत्या काळात पाटील व शिंदे यांची लोकसभेत बहरत असलेली ही मैत्री विधानसभा निवडणुकीत दिसणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT