Amol Kolhe News : सातारकरांना दोन-दोन खासदार देण्याची संधी; अमोल कोल्हेंची नेमकी काय ऑफर?

Narendra Modi vs Sharad Pawar : शरद पवार हे महाराष्ट्रासाठी अस्वस्थ होतात. गुजरातमधील भूकंप काळात पवारांनी आपत्ती निवारणासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी राज्यातील 72 कोटींची कर्जमाफी शेतकर्‍यांना दिली होती.
Amol Kolhe
Amol KolheSarkarnama

Satara Political News : सातारा, बारामती, शिरुरसह देशातील लोकसभेची निवडणूक सर्वसामान्य जनतेने हाती घेतली आहे. गेल्या दहा वर्षात भाजपने लोकांची फसवणूक केली. आता महागाईमुळे सर्वसाामन्य जनतेने निवडणूक हाती घेत मोदी सरकारकडून झालेला अपेक्षाभंग, उद्योगपतींचे धार्जिने हे सरकार घालवण्याचा चंग बांधला आहे. असे असतानाही सातारकरांना जिल्ह्यातून दोन-दोन खासदार देण्याची संधी चालून आली आहे, अशी ऑफरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक खासदार अमोल कोल्हेंनी दिली आहे.

Amol Kolhe
Amol Kolhe on PM Modi : शरद पवार महाराष्ट्राचा आत्मा; अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

महायुतीतीचे उमेदवार शशिकांत शिंदेंच्या Shashikant Shinde प्रचारासाठी कोल्हे साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी सातरकरांना अनोखी ऑफर देत शशिकांत शिंदेंना निवडून आणण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे छत्रपतींच्या गादीचे वारसदार आहेत. त्यांची राज्यसभेची अडीच वर्षे कारकीर्द अद्यापही बाकी आहे. असे असतानाही त्यांनी लोकसभा लढावी असा कोणी अट्टाहास केला? उमेदवारी देताना उदयनराजेंना Udayanraje भाजपने वाईट पद्धतीने वागवले. आता सातारकरांना जिल्ह्यात दोन खासदार देण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. एक तर उदयनराजे पहिलेच राज्यसभेचे खासदार आहेत. आता शशिकांत शिंदेंना लोकसभेवर निवडून देण्याची संधी आहे, असे आवाहन कोल्हेंनी केले आहे.

कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा Sharad Pawar भटकती आत्मा असा उल्लेख केल्याचाही समाचार घेतला. ते म्हणाले, शरद पवार हे महाराष्ट्रासाठी अस्वस्थ होतात. गुजरातमधील भूकंप काळात पवारांनी आपत्ती निवारणासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी राज्यातील 72 कोटींची कर्जमाफी शेतकर्‍यांना दिली होती. त्यातून चार कोटी शेतकऱ्यांचा साताबारा कोरा केला होता. देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्याचे काम त्यांनी केले होते. हाच तो अस्वस्थ आत्मा होता. ते सर्वसामान्य जनतेसाठी अस्वस्थ होत असतील तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Kolhe
Prakash Ambedkar On BJP : 'चारशे पार'वरुन आता दोनशेवरच! स्थानिक पक्षांनीच भाजपची हवा काढली; आंबेडकरांचा टोला

शिरुरबाबत अमोल कोल्हे म्हणाले, सध्या माझ्या समोरचे उमेदवार हे डमी उमेदवार असून ते उद्धव ठाकरे साहेबांशी धोका देऊन गद्दारी करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले. या मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदेंच्या मनातही ते पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते. त्यामुळे स्वार्थासाठी ते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे ते डमी उमेदवार असून त्यांनी स्वार्थासाठी कोलांटा उड्या मारलेल्या आहेत, अशी टीकाही कोल्हेंनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

Amol Kolhe
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com