Narendra Modi | Rahul Gandhi
Narendra Modi | Rahul Gandhi Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रासह 'ही' पाच राज्य ठरविणार लोकसभा निवडणुकीचा निकाल

Akshay Sabale

Mumbai News, 19 May : देशात लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) एकदम चुरशीची होत आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपनं ( Bjp ) चंग बांधला आहे. तर, 'इंडिया' आघाडीकडूनही 'टफ फाइट' देण्यात येत आहे. पण, भाजप आणि काँग्रेसची ( Congress ) मतं ही किंचित वाढणार आहेत. त्यामुळे अनेक छोट्या पक्षांची मतं कमी होण्याची शक्यता आहे. महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक प्रश्नावरून लोकांमध्ये असंतोष असल्याचं दिसत आहे, असं मत राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी व्यक्त केलं आहे.

कोणत्या राज्यांवर निकाल अवलंबून असेल? गुजरात आणि महाराष्ट्रात काय होणार? यासह विविध विषयांवर सुहाश पळशीकर यांनी भाष्य केलं आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुहास पळशीकर म्हणाले, "उत्तर प्रदेश हे सध्या राजकीयदृष्ट्या चिंताजनक राज्य आहे. तिथे भाजपच्या ( Bjp ) 40 ते 50 नैसर्गिक जागा आहेत. पण, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजप अपेक्षापेक्षा जास्त जागांवर निवडून आला. त्यात आता काही बदल होण्याची शक्यता आहे."

"पण, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांमधील जनतेत काही वेगळा सूर दिसत आहे. या राज्यात काय घडतंय त्यावर राजकीय गणितं अवलंबून आहेत. अन्य राज्यांत काही नाट्यमय घडामोडी घडतील, असं वाटत नाही," असं मतही सुहास पळशीकर यांनी व्यक्त केलं.

"2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसारखा उत्साह सध्या दिसत नाही. भाजपनं दावा केल्याप्रमाणं यंदा त्यांच्या जागा वाढणं सध्यातरी कठीण दिसतंय. वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळे निष्कर्ष मतदार काढतील. तामिळनाडू किंवा केरळमध्ये वेगळी कारणं आहेत. तर, गुजरात आणि महाराष्ट्रात वेगळी कारणं आहेत," असंही सुहास पळशीकर यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT