Lok Sabha Elections 2024 : भाजपचं 15 राज्यांत 'एकला चलो रे!'

Lok Sabha Election 2024 : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.
amit shah narendra modi jp nadda
amit shah narendra modi jp naddasarkarnama

Bjp News, 19 May : 'अब की चार सौ पार' हे मिशन डोळ्यांसमोर ठेवूनच भाजप 2024 च्या निवडणूक रिंगणात उतरल्याचं दिसून येतंय. कारण, भाजप ( Bjp ) तब्बल 15 राज्यांत एकट्यानं लढतोय. या 15 राज्यांतील सर्वच्या सर्व म्हणजे 209 जागांवर भाजपनं आपल्या कमळाच्या चिन्हावर उमेदवार उतरवले आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) भाजप कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. 18 व्या लोकसभेत नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसवायचंच या हेतूनं भाजपनं तब्बल 15 राज्यांत स्वपक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपनं या 15 राज्यांत सर्व जागांवर उभे केले उमेदवार

(कंसाबाहेर राज्य व एकूण जागा, कंसात 2019 मध्ये लढलेल्या जागा)

 • प. बंगाल - 42 - (42)

 • मध्यप्रदेश - 29 - (29)

 • गुजरात - 26 - (26)

 • राजस्थान - 25 - (24)

 • ओडिशा - 21 - ( 21)

 • तेलंगणा - 17 - (17)

 • पंजाब - 13 - ( 03)

 • छत्तीसगड - 11 - (11)

 • हरयाणा - 10 - (10)

 • उत्तराखंड - 05 - (05)

 • हिमाचल प्रदेश - 04 - (04)

 • अरूणाचल प्रदेश - 02 - (02)

 • गोवा - 02 - (02)

 • मिझोराम - 01- (01)

 • सिक्कीम - 01- (01)

भाजपनं 2019 मध्ये या 15 राज्यांपैकी गुजरात, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या 05 राज्यांतील सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत भाजपनं प. बंगाल, मध्यप्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड, गोवा, मिझोराम आणि सिक्कीम या 08 राज्यांतही सर्वच्या सर्व जागा लढवल्या होत्या. मात्र, त्या सर्व जागा भाजपला काही जिंकता आल्या नव्हत्या. तरी देखील भाजप आताच्या निवडणुकीत या आठही राज्यांत सर्वच्या सर्व जागा लढवत आहे. 2019 मध्ये भाजपनं राजस्थान आणि पंजाबमध्ये अनुक्रमे 24 आणि 03 इतक्या जागा लढवल्या होत्या. यावेळी मात्र भाजप या दोन्ही राज्यांत सर्व जागा लढवत आहे.

amit shah narendra modi jp nadda
Congress Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचं 13 राज्यांत 'एकटा जीव सदाशिव!'

2019 मध्ये या 15 राज्यात भाजपनं जिंकल्या होत्या 141 जागा

(कंसाबाहेर राज्य व एकूण जागा, कंसात अनुक्रमे लढलेल्या व जिंकलेल्या जागा)

 • प. बंगाल - 42 - (42 - 18)

 • मध्यप्रदेश - 29 - (29 - 28)

 • गुजरात - 26 - (26 - 26)

 • राजस्थान - 25 - (24 - 24)

 • ओडिशा - 21 - ( 21 - 08)

 • तेलंगणा - 17 - (17 - 04)

 • पंजाब - 13 - ( 03 - 02)

 • छत्तीसगड - 11 - (11 - 09)

 • हरयाणा - 10 - (10 - 10)

 • उत्तराखंड - 05 - (05 -05)

 • हिमाचल प्रदेश - 04 - (04 -04)

 • अरूणाचल प्रदेश - 02 -(02 -02)

 • गोवा - 02 - (02 - 01)

 • मिझोराम - 01- (01 - 00)

 • सिक्कीम - 01- (01 - 00)

एकूणच काय तर 2019 मध्ये या 15 राज्यात लढलेल्या 198 पैकी 141 जागांवरच भाजपला यश मिळालं होतं. त्यामुळं 2024 च्या लोकसभेसाठी या 15 राज्यांतील सर्वच्या सर्व जागांवर जरी उमेदवार दिले असले तरी त्या सर्वांना जिंकून आणणं हे भाजपसाठी मोठं आव्हान असणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

amit shah narendra modi jp nadda
Modi Cabinet Meeting : मोदींच्या कॅबिनेट बैठका कशा होतात? गडकरींच्या ‘त्या’ किश्श्यासह माजी मंत्र्याने सांगितली इनसाईट स्टोरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com