Congress Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचं 13 राज्यांत 'एकटा जीव सदाशिव!'

Congress Vs Bjp : 2024 च्या निवडणुकीत भाजपला चारी मुंडया चीत करण्यासाठी काँग्रेससह 'इंडिया' आघाडीनं कंबर कसली आहे.
mallikarjun kharge rahul gandhi
mallikarjun kharge rahul gandhisarkaranama
Published on
Updated on

2024 लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) काहीही करून भाजपला '400 पार' काय बहुमताच्या जवळही जाऊ द्यायचं नाही हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसनंही भाजप ( bjp ) पाठोपाठ 13 राज्यांत स्वबळाचा नारा दिला आहे. या 13 राज्यांतील सर्वच्या सर्व म्हणजे 89 जागांवर काँग्रेसनं आपल्या हाताच्या चिन्हावर उमेदवार उतरवले आहेत.

2024 च्या निवडणुकीत भाजपला चारी मुंडया चीत करण्यासाठी काँग्रेससह 'इंडिया' आघाडीनं कंबर कसली आहे. नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांचं तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ नये यासाठी काँग्रेसनं ( Congress ) तब्बल 13 राज्यांत स्वपक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसनं या 13 राज्यांत सर्व जागांवर उभे केले उमेदवार

(कंसाबाहेर राज्य व एकूण जागा, कंसात 2019 मध्ये लढलेल्या जागा)

कर्नाटक - 28 - (21)

तेलंगणा - 17 - (17)

पंजाब - 13 - (13)

छत्तीसगड - 11 - (11)

उत्तराखंड - 05 - (5)

हिमाचल प्रदेश - 04 - (04)

अरुणाचल प्रदेश - 02 - (02)

गोवा - 02 - (02)

मेघालय - 02- (02)

मणिपूर - 02 - (02)

नागालँड - 01 - (01)

सिक्कीम - 01 - (01)

मिझोराम - 01 - (01)

2019 मध्ये काँग्रेसला या 13 राज्यांपैकी एकाही राज्यात सर्वच्या सर्व जागा जिंकता आल्या नाहीत. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसनं कर्नाटक वगळता तेलंगणा, पंजाब, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, मेघालय, मणिपूर, नागालँड, सिक्कीम आणि मिझोराम या 12 राज्यांत सर्वच्या सर्व जागा लढवल्या होत्या. मात्र, त्या सर्व जागा काही काँग्रेसला जिंकता आल्या नाहीत. तरी देखील काँग्रेस आताच्या निवडणुकीत या बाराही राज्यांत सर्वच्या सर्व जागा लढवत आहे. 2019 मध्ये काँग्रेसनं कर्नाटकात 21 जागा लढवल्या होत्या. यावेळी मात्र काँग्रेस या राज्यात सर्व जागा लढवत आहे.

2019 मध्ये या 13 राज्यांत जिंकल्या होत्या 16 जागा

(कंसाबाहेर राज्य व एकूण जागा, कंसात अनुक्रमे लढलेल्या व जिंकलेल्या जागा)

कर्नाटक -28 - (21- 01)

तेलंगणा - 17 - (17 - 03)

पंजाब - 13 - (13 - 08)

छत्तीसगड - 11 - (11- 02)

उत्तराखंड - 05 - (05 - 00)

हिमाचल प्रदेश - 04 - (04 - 00)

अरुणाचल प्रदेश - 02 - (02 - 00)

गोवा - 02 - (02- 01)

मेघालय - 02- (02 - 01)

मणिपूर - 02 - (02 - 00)

नागालँड - 01 - (01- 00)

सिक्कीम - 01 - (01- 00)

मिझोराम - 01 - (01 - 00)

mallikarjun kharge rahul gandhi
Congress News : काँग्रेसला उशिराने सुचलेले शहाणपण !

एकूणच काय तर 2019 मध्ये या 13 राज्यांत लढलेल्या 82 पैकी अवघ्या 16 जागांवरच काँग्रेसला यश मिळालं होतं. इतकंच नव्हे तर या 13 राज्यांपैकी 07 राज्यांत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळं 2024 च्या लोकसभेसाठी या 13 राज्यांतील सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभं करण्याचं धाडस काँग्रेसनं दाखवलंय, हे विशेष!

( Edited By : Akshay Sabale )

mallikarjun kharge rahul gandhi
Lok Sabha Election 2024 News :'गेम ओव्हर फॉर मोदी!'; वाढदिवस डी. के. शिवकुमारांचा अन् चर्चा केरळ काँग्रेसच्या ट्विटची

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com