Thane News : ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जात असल्याने कल्याणप्रमाणेच ठाणे लोकसभा ही शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यातच भाजपने ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यानंतर कल्याणप्रमाणे ठाणे लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात शिंदेंना यश आल्याचे बोलले जात आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार शिंदे गटाकडे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आता शिंदे गटाकडून महिला उमेदवार देण्याचे जवळपास निश्चित झाल्याने माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ( Lok Sabha Election 2024 News)
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर ठाणे लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपले दावेदारी सांगण्यास सुरुवात केली होती. शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांची नावे पुढे आली होती. त्यामध्ये रवींद्र फाटक यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे मध्यंतरी बोलले जाऊ लागले होते. तसेच फाटकांनी तयार सुरू केली होती. तर भाजपकडून ही माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, संजीव नाईक, आमदार संजय केळकर याचबरोबर गणेश नाईक यांचे नावही चर्चेला जाऊ लागले आहे.
त्यानुसार संजीव नाईक सुरुवात जोर धरला होता. पण, सहस्रबुद्धे यांचे नाव पुढे आल्यावर अचानक संजीव नाईक थांबल्याचे दिसू लागले. त्यातच सहस्रबुद्धे यांनी गिअर टाकल्याचे पाहण्यास मिळाले होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी खासदार आनंद परांजपे यांचे नाव पुढे आले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या लोकसभेचा तिढा सुटत नसल्याने शिवसेना (Shivsena) आणि भाजप (Bjp) या दोघांनी या मतदारसंघावर आपले दावे सुरू ठेवले आहेत. पण, हा मतदारसंघ शिंदे यांच्या वाटेला आल्यास ठाकरे गटाचे विचारे यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार म्हणून शिंदे गटाकडून माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यातच, शिंदे आडनाव असल्याने त्या प्रभावी ठरतील, याशिवाय महिला असल्याने त्या नावाची चाचपणी सुरू असल्याचे दिसत आहे.
मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांच्याकडे आक्रमक चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यातच त्या शिंदे गटाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख आहेत. तसेच त्या तीन वेळा नगरसेविका असून ठाण्याच्या माजी महापौर आहेत. शिंदेंनी फारकत घेतल्यानंतर ठाण्यातून ठाकरेंनी पहिली हकालपट्टी त्यांचीच केली होती. याशिवाय मीनाक्षी शिंदे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय मानले जातात.
(Edited by : Sachin Waghmare)
R