Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : लोकसभेची 2024 ची निवडणूक स्वराज्यासाठीची दुसरी लढाई; ठाकरेंच्या शिलेदराचा हल्लाबोल

संदीप पंडित

Thane Political News : राष्ट्राचे रक्षण करणे, हा आपला महाराष्ट्र धर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला तो महाराष्ट्र धर्म दिला आहे. ज्या ज्या वेळी आक्रमणे झाली; त्या त्या वेळी महाराष्ट्र एकजुटीने उभा राहिला आहे. 2024 ची निवडणूक ही स्वराज्यासाठीची दुसरी लढाई आहे. ही निवडणूक आपले भविष्य घडवणारी निवडणूक असणार आहे.' असे म्हणत ठाकरे गटाचे नेते नितीन बानुगडे-पाटलांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते 'निर्भय बनो' व महाविकास आघाडीच्या संयुक्त कार्यकर्ता महामेळाव्यात ते बोलत होते. Nitin Bangude Patil Attack on BJP Over Palghar.

बानगुडे पाटील म्हणाले, विकास हवा आहे. पण पालघर जिल्ह्यात होत असलेला विकास हा विनाशकारी आहे. इथे सर्वसामान्य जनतेचा वाढवण बंदराला विरोध आहे. भूमिपुत्रांच्या छाताडावर विकासाच्या इमारती उभ्या राहणार असतील तर त्यांचा उपयोग तरी काय? असा प्रश्न करत नितीन बानुगडे-पाटलांनी पालघरसाठी शाश्वत विकासाची अपेक्षा व्यक्त केली.

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून या देशाचा गौरव झाला. पण नंतरच्या काळात मतपेट्या पळवल्या जाऊ लागल्या. नंतर आमदार पळवून नेऊ लागले. आणि आता पक्षच पळवून नेले जातायत. उद्धव ठाकरे लोकमान्य ठरत आहेत, हे त्यांनी पाहिले आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू केले, अशी टीकाही त्यानी केली.

महाराष्ट्रातील उद्योग-धंदे गुजरातला न्यायचे, आरेचे जंगल मेट्रोला द्यायचे होते, धारावी अदानीला द्यायची होती आणि वाढवण बंदर करायचे होते म्हणूनच यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नको होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना तुम्ही उतरवू शकता; पण जनतेच्या मनातून काढून टाकू शकत नाही, अशा शब्दांत महाराष्ट्रद्वेषी गद्दारांचा नितीन बानुगडे-पाटील यांनी समाचार घेतला.

पालघर जिल्हा हा अशोक सम्राटाची भूमी आहे. अनेक जाती-धर्मांच्या मंदिरांचा वारसा जपणारा हा जिल्हा आहे. चिमाजी आप्पांच्या पराक्रमाचा संपन्न वारसा असलेली भूमी आहे. देशातील पहिला आण्विक ऊर्जाप्रकल्प असलेला हा जिल्हा आहे. आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेला हा जिल्हा आहे. तसेच निसर्गाचे भरभरून दान मिळालेली ही भूमी आहे. वारली चित्रकलेचा हा जिल्हा आहे. साऱ्यांच्या समतेच्या-समानतेच्या धाग्यात गुंफलेला हा जिल्हा आहे, असे ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण दाखले देत नितीन बानुगडे-पाटील यांनी पालघर जिल्ह्याची महती अधोरेखित केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT