Amit Shah| Raj Thackeray | Narendra Modi  Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray Alliance BJP : राज ठाकरेंचं दिल्लीत 'डील', भाजपसोबत जाणार, दोन जागा लढवणार?

Raj Thackeray News : राज यांना आपल्याकडे ठेवून ठाकरे आणि पवारांविरोधात त्यांच्यात भाषेत आणि तशाच स्टाइलमध्ये रान उठविण्याची भाजपची नीती आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ठाकरेंची शिवसेना फोडून, माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांना धक्क्यांवर धक्के देऊन न भागलेल्या सत्ताधारी भाजपने आता राज ठाकरेंच्या मनसेचे 'इंजिन' ही आपल्याकडे ओढले. अर्थात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे भाजपला साथ देऊन लोकसभेच्या रणांगणात उतरणार असल्याचे स्पष्ट आहे.

त्याकरिताच्या वाटाघाटींसाठी राज हे दिल्लीत पोचले, त्यानंतरच्या काही १५ तासांत गुप्त बैठका, चर्चा झाल्या आणि राज हे भाजपसोबत राहणार असल्याचे सांगण्यात आले. पुढच्या निवडणुकीत राज यांच्या पक्षाला मुंबईत एक किंवा दोन जागा मिळू शकतात. मात्र, त्यावर अजूनही खल सुरू आहे. पण, राज हे आता भाजपच्या प्रचारासाठी सभा गाजवणार, हे नक्की आहे.

राज यांना आपल्याकडे ठेवून ठाकरे आणि पवारांविरोधात त्यांच्यात भाषेत आणि तशाच स्टाइलमध्ये रान उठविण्याची भाजपची नीती आहे. ठाकरे-पवारांकडचे ताकदवान नेते फोडल्यानंतर ही मंडळी भाजप आणि मित्रपक्षाच्या नाकीनऊ आणत असल्यानेच भाजपने आता राज (Raj Thackeray) यांच्या सभांचा उतारा शोधल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपसोबत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर एकत्र यायचे, जागावाटप म्हणजे, मनसेला किती जागा मिळणार, त्या बदल्यात राज यांचा वापर कसा होणार, तो कुठे होणार, पुढच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय गणित कसे असेल, यावर राज हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत चर्चा करू शकतात. त्याआधी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी (Vinod Tawde) राज यांची दिल्लीत भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली. त्यामुळे भाजप-मनसे हे नवे समीकरण 'परफेक्ट' असल्याचे स्पष्ट आहे.

दरम्यान, सोमवारी (18 मार्च) रात्री राज ठाकरे यांना दिल्लीतील काही पत्रकारांनी गाठलं. तेव्हा पत्रकार आणि राज ठाकरेंच्यात काही अनौपचारिक संवाद झाला. भेटीचं कारण आपल्याला ठाऊक नसल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. अन्यवेळी राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज' किंवा आता 'शिवतीर्थ' निवासस्थानी इतर पक्षीय नेते, मंडळी येत असत.

अगदी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, नारायण राणे यांनीही राज ठाकरेंच्या घरी झाऊन भेटीगाठी घेतल्या होत्या. पण, गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी चक्क राज ठाकरेंना दिल्लीला बोलावणं आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, उघड भेटीमुळे मनसे-भाजप युतीची नांदी झाल्याचंही चित्र आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT