Amit Shah : शाह, फडणवीसांच्या निशाण्यावर एमआयएम; म्हणाले, 'नव्या निजामांना घरी बसवा'

Loksabha Election 2024 : हिंदू मतांच्या विभाजनाचा थेट फायदा एमआयएमला होऊन इम्तियाज जलील यांच्या रुपाने त्यांचा पहिला महाराष्ट्रातील खासदार संसदेत निवडून गेला होता. याचे शल्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जेवढे आहे, तेवढेच भाजपलाही असल्याचे स्पष्ट झाले.
Amit Shah
Amit Shah Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या मंत्री, नेत्यांच्या निशाण्यावर आज एमआयएम असल्याचे त्यांच्या भाषणातून दिसून आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचा पराभव झाला होता.

हिंदू मतांच्या विभाजनाचा थेट फायदा एमआयएमला होऊन इम्तियाज जलील यांच्या रुपाने त्यांचा पहिला महाराष्ट्रातील खासदार संसदेत निवडून गेला होता. याचे शल्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जेवढे आहे, तेवढेच भाजपलाही असल्याचे आजच्या शाह, फडणवीसांच्या भाषणातून स्पष्ट झाले.

अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या भाषणात सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात केलेल्या पोलिस ॲक्शनचा संदर्भ देत या नव्या निजामाला घरी पाठवा, असे म्हणत मजलीस को संभाजीनगरसे उखाड फेको, असे आवाहन केले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गेल्यावेळी केलेली चूक पुन्हा करू नका. जो खासदार तुम्ही निवडून दिला त्याने संसदेत कलम 370, राम मंदिर आणि गोरगरीबांच्या कल्याणासाठी कधी समर्थन दिले होते का? असा सवाल करत एमआयएम (MIM) विरोधात आक्रमक भूमिका घेतली.

शाह यांनी आपल्या भाषणात देशात जेव्हा भाजपच्या खासदारांची चर्चा होते, तेव्हा संभाजीनगर से कौन चुन के आया अशी विचारणा केली जाते, तेव्हा आमची मान शरमेने खाली जाते असे सांगितले. आता जेव्हा भाजपने अब की बार चारसो पार चा नारा दिला आहे, तेव्हा संभाजीनगरचा खासदार आपलाच निवडून आला पाहिजे, असे आवाहन उपस्थितांना केले. पुढील पाच वर्ष देशाचे भविष्य कोणाच्या हातात सोपवायचे याचा फैसला करणारी ही निवडणूक असणार आहे. एनडीए विरुद्ध राहुल बाबाच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी (INDIA Aghadi) चे घमंडिया शी आपला सामना होणार असल्याचे शाह म्हणाले.

Amit Shah
Loksabha Election 2024 : अब की बार चारसौ पार नव्हे; हे 420 सरकार होणार हद्दपार!

सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, स्टॅलीन यांचा उल्लेख करत ज्यांना फक्त आपल्या परिवारातील कोणाला तरी पंतप्रधान, मुख्यमंत्री बनवायचं आहे, अशा लोकांना थारा देऊ नका, ते तुमचा विकास काय करणार? असे म्हणत टोला लगावला. भारताला विश्वगुरू करण्याचे लक्ष एकीकडे तर दुसरीकडे परिवारवादी लोक आहेत, अशा शब्दात शाह यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. दोन्ही निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला 50 टक्के मते दिली, मी तुमचे आभार मानतो.

संभाजीनगरने एक कसर ठेवली होती, आमची एक छोटी चूक झाली, तुम्हाला हे मान्य आहे का? सरदार पटेलांनी निजामापासून मुक्ती दिली होती. या नव्या निजामांना घरी बसवा. यावेळी 45 पेक्षा जास्त जागा मोदींच्या झोळीत टाका. आम्ही दहा वर्षाच्या विकासाच्या जोरावर मतं मागणार आहोत. 2004 ते 14 च्या युपीए सरकारच्या काळात महाराष्ट्राला काय मिळाले तर फक्त 1 लाख 91 हजार कोटी. पण मोदींजीनी दहा वर्षातच त्यांच्या चारपट म्हणजे 7 लाख 90 हजार कोटी दिल्याचा दावा शाह यांनी केला. याशिवाय वेगवेळ्या प्रकल्प आणि योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला 16 लाख कोटी विकासासाठी दिल्याचे शाह म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंडिया आघाडीला माझे आव्हान आहे, त्यांनी समोर येऊन चाळीस वर्षाचा हिशोब द्याव, आम्ही आमचे दहा वर्षाचे रिपोर्ट कार्ड सादर करतो, असे आव्हानच शाहा यांनी जाहीर सभेतून राज्यातील महाविकास आघाडी आणि तत्कालीन युपीएच्या नेत्यांना दिले. सर्जिकल स्ट्राईक, कलम 370, साडेपाचशे वर्षापासूनचा अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न मोदी सरकारने सोडवल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसने राम मंदिराचा प्रश्न सत्तर वर्ष रखडवल्याचा आरोप केला.

ज्या औरंगजेबाने काशी विश्वनाथाचे मंदिर तोडले होते, त्याच काशीत मोदीजींनी काशी काॅरिडोर तयार केले. जुने कायदे बदलले, नवी संसद इमारत बनवली असे सांगतानाच बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही मानतो म्हणूनच त्यांनी बघितलेले छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणाचे स्वप्नही आम्ही पुर्ण केले, असा दावाही शाह यांनी केला. युपीए सरकारच्या काळात अकराव्या नंबरवर असलेली देशाची अर्थव्यवस्था मोदींच्या काळात दहा वर्षात आम्ही पाचव्या क्रमांकावर आणली. तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करा, अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणू, ही मोदी गॅरंटी आहे, असेही शाह यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Amit Shah
Devendra Fadnavis : स्वप्न बाळासाहेबांचे, पूर्ण केले अमित शाहांनी; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com