Raj Thackeray On Sharad Pawar : "राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्या माणसांची मोळी," राज ठाकरेंनी पवारांना डिवचलं

Raj Thackeray In Nashik : "राजकारणात वावरायचं, राहायचं आणि टिकायचं असेल, तर...", असा सल्ला राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला.
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkaranama
Published on
Updated on

मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. सध्या महाराष्ट्रात दुसऱ्यांची मुलं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळत आहे. तसलं सुख मला नको आहे. माझ्यात तेवढी ताकद आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी भाजपला टोला लगावला. तसेच, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. मनसेचा 18 वा वर्धापन दिन नाशिकमध्ये पार पडला. तेव्हा राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

Raj Thackeray
MNS 18th Foundation Day : मनसेला गतवैभव मिळवून देणार नाशिक?

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना मनसेच्या पूर्वी झाली. पण, राष्ट्रवादीला ( Ncp ) मी पक्ष संबोधणार नाही. राष्ट्रवादी ही निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे. शरद पवार ( Sharad Pawar ) हेच आजपर्यंत करत आलेत. निवडून येणाऱ्यांना बरोबर घेऊन हा माझा पक्ष असल्याचं शरद पवार सांगतात. ते वेगळे झाले, तरी निवडून येणार आहेत," असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला.

"संयम महत्त्वाचा आहे"

"जनसंघ, शिवसेना, मनसे हे पक्ष खऱ्या अर्थानं स्थापन झालेले पक्ष आहेत. यातील 99 टक्के लोकांचा कुठल्याही राजकारणाशी संबंध नव्हता. अविनाश जाधव मनसेत येण्यापूर्वी राजकीयदृष्ट्या कोणत्याही पक्षात सक्रिय नव्हते. असे हजारो तरुण-तरुणी या पक्षात नावारूपाला आले आणि येत आहेत. अनेकजण आमदार-नगरसेवक होतील. पण, संयम महत्त्वाचा आहे," असा सल्ला राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) मनसैनिकांना दिला.

Raj Thackeray
MNS 18 Vardhapan Din 2024 : ...म्हणून राज ठाकरेंची झोळी रिकामीच

"2014 मध्ये कार्यकर्त्यांमुळं भाजपला यश"

"राजकारणात वावरायचं, राहायचं आणि टिकायचं असेल, तर संयम लागतो. तुमच्या आजूबाजूच्या राजकीय पक्षांचं यश दिसत आहे. काहींना वाटतं 2014 मध्ये भाजपला नरेंद्र मोंदीमुळं यश मिळालं आहे. पण, हे संपूर्ण श्रेय पक्षासाठी कार्यकर्त्यांचं आहे," असंही राज ठाकरे म्हणाले.

R

Raj Thackeray
MNS 18th Vardhapan Divas : मनसेचा राजकारणातील करिश्मा आजही कायम !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com