Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News : मोदींना पाठिंबा देण्यामागचं राज ठाकरेंनी सांगितलं 'कारण'; मनसेच्या मागण्याही सांगितल्या

Raj Thackeray On Narendra Modi : "मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षांतील गोष्टींना मी विरोध केला," असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

Akshay Sabale

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत पक्षाचे पदाधिकारी, सरचिटणीस, कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, राज ठाकरेंनी शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावरही अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले, "कलम 370 रद्द होणं, राम मंदिरसारख्या चांगल्या गोष्टींचं मी स्वागत केलं आहे. धर्माच्या आधारावर आपल्याला राष्ट्र उभे करायचं नाही. पण, 1992 पासून 2024 पर्यंत राम मंदिराचा विषय रखडलेला होता. यासाठी कित्येक कारसेवकांनी आहुती दिली. शरयू नदीत कारसेवकांची प्रेतं फेकून दिली होती. मात्र, राम मंदिर उभे राहिल्यानंतर कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील."

"सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) नसते; तर राम मंदिर उभे राहिले नसते. काही गोष्टी चांगल्या होताना दिसायला लागल्यानं नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा संधी देणं आवश्यक वाटलं. म्हणून मनसेनं मोदींना पाठिंबा द्यायचं ठरवलं," असं राज ठाकरेंनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षांतील गोष्टींना मी विरोध केला. मी भूमिका बदलल्याचं अनेकजण सांगतात. पण, मला भूमिका बदलणं आवश्यक होतं. त्याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत, तर धोरणांवरती टीका म्हणतात. तशी टीका मी केली. पण, मुख्यमंत्रिपदासाठी किंवा 40 आमदार सोडून गेले म्हणून मी टीका करत नाही," असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

"माझ्या महाराष्ट्रासाठी काही मागण्या आहेत. त्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा, गडकिल्ले संवर्धन याचा समावेश आहे. औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र पुढारलेला आहे. उद्योगांची पहिली पसंती महाराष्ट्राला आहे. मोदींना गुजरात प्रिय असणे हे स्वाभाविक आहे. अन्य राज्यांकडे समान भूमिकेतून पाहावे," असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT