Mumbai News: लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने तर तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी मोठी रणनीती आखली असून यासाठी महायुतीचे नेते कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात महायुतीतील नेत्यांनी सभा, मेळावे, बैठकांचा धडाका लावला आहे. (Lok Sabha Election 2024)
आता लोकसभेसाठी महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपचं सूत्र ठरल्याची चर्चा आहे. भाजप 32, शिवसेना (शिंदे गट) 12 आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) 4 जागा, असा नवा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याबाबत अद्याप महायुतीतील नेत्यांनी अधिकृतपणे कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीतून होणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या जातात ? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. तर भाजपच्या काही विद्यामान खासदारांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांच्या जागी तरुण उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, महायुतीच्या विरोधात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी जोरदार रणनीती आखत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही अद्याप समोर आलेला नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु असून 40 जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. तर यातील ठाकरेंच्या वाट्याला लोकसभेच्या 18 जागा येण्याची शक्यता आहे. पण महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्म्युला कसा असणार, आघाडीतील कोणत्या पक्षाला किती जागा देण्यात येणार, हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.