Ajit Pawar Uddhav thackray and Nana Patole  sarkarnama
मुंबई

Lok Sabha elections 2024 : लोकसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला ; ठाकरे गट मुंबईत ६ पैकी..

Lok Sabha elections 2024 News update : जागा वाटपाचा आघाडीचा फॉर्म्युला कसा असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती.

सरकारनामा ब्युरो

Lok Sabha elections 2024 News update : आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचा निर्णय झाला आहे.

काल (बुधवारी) मुंबईत यशंवतराव चव्हाण सेंटर येथे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

जागा वाटपाचा आघाडीचा फॉर्म्युला कसा असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. राज्यात लोकसभेसाठी ४८ जागा आहेत. मविआने या जागा एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला.

ठाकरे गट २१, राष्ट्रवादी काँग्रेस १९, काँग्रेस ८ जागा असा हा फॉर्म्युला ठरला आहे. मुंबईत ६ पैकी ४ जागा ठाकरे गट लढविणार आहे. एका वृत्तवाहिनीने ही माहिती दिली आहे.

आघाडीची बैठक काल (बुधवारी) झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत भाजपवर निशाणा साधला. कॉंग्रेससोबत जाऊन आम्ही हिंदुत्व सोडलं तर ममता बॅनर्जीचा पाठिंबा घेतला तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं होतं का?, काश्मीरमध्ये मुफ्तींसोबत जाऊन तुम्ही काय केलं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. अटलबिहारी वाजपेयींचं सरकार सेक्युलर चेहरा घेऊन सरकार चालवल होत याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.

राज्यात आघाडी सरकारने सरकार स्थापन केले होते, येत्या लोकसभा आणि स्थानिक निवडणुकीतही आघाडी एकत्र निवडणुका लढवेल, असे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT