Border Conflict : सीमाप्रश्नानं पुन्हा डोकं वर काढलं ; शिंदेंनी जाहीर केलेला निधी बोम्मई रोखणार ? ; काय आहे प्रकरण ?

Maharashtra Karnatak Border Conflict : निधी रोखण्यासाठी बोम्मई सरकारवर विरोधीपक्ष दबाब टाकत आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkaranma

Maharashtra Karnatak Border Conflict : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने सीमाभागातील मराठीबहुल ८६५ गावांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून ५४ कोटींचा निधी जाहीर केला आहे. या निधीवरुन आता महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये राजकारण तापलं आहे.

काही महिन्यापूर्वी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पेटला होता, तो शांत होत असतानाच आता या नव्या वादामुळे दोन्ही राज्यात वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Eknath Shinde
SSC Maths Paper Leak: धक्कादायक : दहावीचा गणित भाग 1 चा पेपर फुटला ? ; महिला सुरक्षा रक्षकावर..

महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठीबहुल गावांसाठी निधी जाहीर केल्याचे समजल्यावर कर्नाटकात सत्ताधारी बोम्मई सरकाराला विरोधकांनी धारेवर धरले आहे. त्यामुळे हा निधी रोखण्याची तयारी कर्नाटक सरकारने केली आहे. हा निधी रोखण्यासाठी बोम्मई सरकारवर विरोधीपक्ष दबाब टाकत आहे.

Eknath Shinde
Lok Sabha elections 2024 : लोकसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला ; ठाकरे गट मुंबईत ६ पैकी..

आपल्या राज्यातील गावांसाठी इतर राज्यातील सरकार निधी देत असेल तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

या निधीवरुन मुख्यमंत्री बोम्मईंविरोधात कर्नाटक विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी टीका केली आहे.

विरोधीपक्षाने या निधीवरुन गदारोळ केल्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, "महाराष्ट्र सरकारने दिलेला निधी रोखण्यात येईल. महाराष्ट्र सरकार इथे निधी देत आहे, तर मग मी राजीनामा द्यावा का?

"आपणही महाराष्ट्रातील पंढरपूर, तुळजापूरसारख्या ठिकाणांसाठी निधी दिला आहे. कारण या ठिकाणी कर्नाटकचे लोक जात असतात. या प्रकरणात मी लक्ष घालेन. काय करायला हवं, हे मला शिवकुमार यांच्याकडून शिकण्याची गरज नाही. हा निधी थांबवण्यासाठी आम्ही पावलं उचलू.” असे बोम्मई म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com