Ajit Pawar in Mumbai NCP Meeting
Ajit Pawar in Mumbai NCP Meeting sarkarnama
मुंबई

Loksabha 2024 : मतदारसंघाचा आढावा घेताना प्रत्येकाला विश्वासात घेण्यात आले!

Umesh Bambare-Patil

NCP Ajit Pawar News : लोकसभा मतदारसंघानुसार कार्यकर्त्यांचे... स्थानिक नेत्यांचे... संपर्कमंत्री आणि आमचे असलेले पालकमंत्री यांचे मनोगत दोन दिवस झालेल्या आढावा बैठकीत जाणून घेण्यात आले आहे. या क्षणालादेखील जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक घेऊन सर्वांना विश्वासात घेण्याचे काम करण्यात आले आहे. आता फायनल यादी जाहीर झाल्यावर जोमाने कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १६ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक ५ व ६ मार्च रोजी महिला विकास मंडळ सभागृह मुंबई येथे पार पडली. या बैठकीत पहिल्या दिवशी नाशिक, दिंडोरी, गोंदिया - भंडारा, दक्षिण मुंबई, हिंगोली, धाराशिव, रायगड या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला, तर दुसऱ्या दिवशी कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर दक्षिण, गडचिरोली या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.

या आढावा बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, लोकसभा प्रचारप्रमुख व कृषिमंत्री धनंजय मुंडे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) म्हणाले, मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांचे व स्थानिक नेत्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले आहे. सध्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून ही आढावा बैठक झाली असून, सर्वांना विश्वासात घेण्याचे काम करण्यात आले आहे. त्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यावर सर्वजण जोमाने कामाला लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सर्व आमदार, माजी खासदार आदींसह पक्षाच्या सेलचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT