BJP  Sarkarnama
मुंबई

Maharashtra BJP : भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटे कापणार; कोण टिकणार, कोण उडणार?

Vijaykumar Dudhale

Mumbai News : राज्यातील भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीमध्ये पत्ता कट होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्व्हेत या खासदारांचा स्ट्राइक रेट समाधानकारक नसल्याचा रिपोर्ट आला आहे. ज्या खासदारांचा स्ट्राइक रेट चांगली नाही, त्यांचा उमेदवारीमध्ये पत्ता कट होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे भाजपच्या राज्यातील खासदारांची धाकधूक वाढली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाकडून राज्यातील पक्षाच्या खासदारांचे (MP) अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले आहेत. त्या सर्व्हेमध्ये डझनभर खासदारांचा स्ट्राइक रेट समाधानकारक नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे ज्यांचा स्ट्राइक रेट चांगला नाही, त्या खासदाराचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील भाजप खासदारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी (Loksabha Candidature ) देताना विद्यमान खासदारांची कामगिरी पाच वर्षांत कशी राहिली, हाच निकष भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून डोळ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोणाचे नाव येणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. येत्या दोन दिवसांत भाजपची उमेदवारांची यादी येण्याची शक्यता आहे, त्यामध्ये डझनभर विद्यमान खासदारांची नावे नसण्याची दाट शक्यता आहे.

या मतदारसंघातील उमेदवार बदलणार?

भाजपकडून बीड, धुळे, सोलापूर, सांगली, लातूर, जळगाव, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नांदेड, नगर, वर्धा, रावेर या मतदारसंघांची विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मतदारसंघात नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तिकीट कापण्याची ही आहेत कारणे

सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यमान खासदारांबाबत असलेली नाराजी. निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता, तीनपेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप, या कारणांमुळे भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT