मुंबई

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रिंगणात वर्षा गायकवाडांना टक्कर देणारे उज्वल निकम कोण?

Ujjwal Nikam ॲड.उज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे पुतणे रोहित निकम हे जळगाव भाजपचे उपाध्यक्ष आहेत,जिल्हा दूध संघाचे संचालक आहेत.

कैलास शिंदे

Mumbai Loksabha News :उत्तर मध्यमुंबईतून भाजपतर्फे राज्याचे माजी विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांची उमेदवारी निश्‍चीत झाली आहे. ॲड.उज्वल निकम यांनी राज्यातील मुंबई बॉम्बस्फोट खटला, मुंबई हल्ला प्रकरणाचा खटला तसेच इतर महत्वाच्या खटल्यात राज्याचे विशेष सरकारी वकिल म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई हेच राहिले आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील माचले गावचे हे ॲड.उज्वल निकम रहिवाशी आहेत. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व वकिलीचे शिक्षण जळगाव येथेच झाले आहे. जळगाव येथे त्यांनी वकिली व्यवसायास सुरूवात केली, जळगाव येथेच अनेक खटल्यात त्यांनी सरकारी वकिल म्हणून काम पाहिले. त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात राज्याचे विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे देशभरात त्यांची ओळख झाली.

पुढे राज्यातील अनेक महत्वाच्या खटल्यात त्यांनी विशेष सरकारी वकिल म्हणून त्यांनी गेली तीस वर्षे काम पाहिले आहे. ॲड.उज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे पुतणे रोहित निकम हे जळगाव भाजपचे उपाध्यक्ष आहेत,जिल्हा दूध संघाचे संचालक आहेत. त्यांनीही जळगाव लोकसभा मतदार संघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्या दृष्टीने त्यांची तयारीही सुरू होती.

ॲड.निकम यांचे मूळ कॉंग्रेसचे घराणे आहे, ॲड.निकम यांचे वडिल (कै.) बॅरिस्टर देवराम निकम हे चोपडा तालुक्यातून कॉंग्रेसचे आमदार होते. तसेच सहकार क्षेत्रातही त्यांचे कार्य होते. त्यांचे बंधू दिलीप निकम व भावजय शैलजा निकम या कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांचे पुतणे रोहित निकम यांनी सांगितले की, ॲड.निकम यांना उमेदवारी मिळाल्याने आम्हाला आनंद झाला आहे.ॲड.निकम यांनी विशेष सरकारी वकिल म्हणून केलेले कार्य जनतेला माहितच आहे. जनतेचा प्रतिनिधी म्हणूनही ते देशात एक चांगले कार्य करतील असा विश्‍वास आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT