Loksabha Election 2024 : मोठी बातमी! वर्षा गायकवाडांविरोधातला भाजपचा चेहरा ठरला; उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Mumbai Political News : विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन या सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यांचा पत्ता कट झाला आहे.
Ujjwal Nikam, Varsha Gaikwad
Ujjwal Nikam, Varsha Gaikwad Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेसच्या माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. आता त्यांच्याविरोधात भाजपकडून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड आणि महायुतीचे भाजपचे उमेदवार ज्ज्वल निकम Ujjawal Nikam यांच्यात थेट लढत होणार आहे.

महाविकास आघाडीने जरी आपला उमेदवार जाहीर केला असला, तरी या मतदारसंघात महायुतीकडून कोणालाही उमेदवारी जाहीर केली गेलेली नव्हती. या मतदारासंघासाठी मोठा महायुतीत मोठा खल झाला होता. त्यात विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन Poonam Mahajan या सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. मात्र, आता भाजपाने या मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर करत थेट ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनाच मैदानात उतरवलं आहे.

Ujjwal Nikam, Varsha Gaikwad
Imtiaz Jaleel Meet Manoj Jarange : आजारी जरांगे पाटलांची इम्तियाज जलील यांनी घेतली भेट

राज्य आणि देशपातळीवर गाजलेले अनेक महत्त्वाचे खटले लढविणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती. निकम हे मूळचे उत्तर-महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत. राज्यात आणि देशात त्यांची ओळख विशेष सरकारी वकील म्हणून आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला, 2008 मुंबई हल्ला, शक्ती मिल बलात्कार केस, कोपर्डी बलात्कार आणि हत्या, खैरलांजी हत्याकांड यांसारखे मोठे खटले लढवले आहेत. आता ते राजकारणात आपलं नशीब आजमावत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर मध्य मुंबईच्या विद्यमान भाजप खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार होती. त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळणार की भाजप या ठिकाणी नवा चेहरा देणार याबाबत उत्सुकता होती. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मुंबईचा आक्रमक चेहरा आशिष शेलार यांच्यासह अनेक नावं चर्चेत होती.

पूनम महाजन यांच्यापेक्षा आशिष शेलार लढल्यास विजयाची शक्यता अधिक असल्याचे सर्वेक्षण आणि ज्येष्ठ नेत्यांचे मत असल्याची चर्चा होती. पण आता या मतदारसंघातून आता भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देत भाजपने मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे या गायकवाड विरुद्ध निकम अशी चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

R

Ujjwal Nikam, Varsha Gaikwad
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com