-दिनेश गोगी
Ulhasnagar News : महायुतीतील सर्व धर्मियांसोबत उल्हासनगरातील सिंधी नेते आणि राजकीय वैरी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी पुन्हा एकवटले आहेत. त्यांच्या विकास रथाचे माजी आमदार पप्पू कलानी, आमदार कुमार आयलानी सारथी बनल्याचे रॅलीत पहायला मिळाले. यामुळे संपूर्ण उल्हासनगर शहरातून महायुतीचे शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना रेकॉर्डब्रेक मते मिळतील आणि विजयाची हॅटट्रिक करतील असा विश्वास कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
उल्हासनगर शहरात दोन टप्प्यात डॉ. श्रीकांत शिंदे यांची रॅली झाली. पहिला टप्पा हा अंबरनाथ विधानसभा व कल्याण पूर्व विधानसभेतील भागाचा समावेश होता. या रॅलीत खासदार डॉ. शिंदे यांच्यासमवेत जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, कुमार आयलानी, शिवसेनेचे चंद्रकांत बोडारे,अरुण आशान, राजेंद्र चौधरी, रमेश चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, कमलेश निकम,मनोज लासी, प्रमोद टाले यांनी सहभाग घेतला.
कलानी-आयलानी एकत्र
उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातील दुसरा टप्पा हा लक्षवेधक ठरला आहे. या रॅलीत डॉ. श्रीकांत शिंदेंसोबत सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे प्रणेते, चारवेळा आमदार झालेले व जन्मठेपेच्या शिक्षेतून बाहेर आलेले माजी आमदार पप्पू कलानी, विद्यमान आमदार कुमार आयलानी, आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री, मनसेचे शहराध्यक्ष संजय घुगे आदी सहभागी झाले होते.
राजकीय विरोधक एकवटले
युथ आयकॉन ओमी कलानी यांच्या टीमसोबत कुमार आयलानी, प्रदीप रामचंदानी, भगवान भालेराव, भारत गंगोत्री यांचे राजकीय गणित जुळत नसून त्यांचे राजकीय वैर हे अनेकदा सोशल मीडियावर उघड होते. असे असले तरी डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सोबत पप्पू कलानी, कुमार आयलानी,भगवान भालेराव,प्रदीप रामचंदानी,भारत गंगोत्री हे एकाच रथावर एकवटल्याने डॉ.श्रीकांत शिंदे यांनी रथी महारथिंची मोट बांधली असा सकारात्मक सूर उमटू लागला आहे.
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
शिंदे-ओमी कलानी दोस्ती गठबंधन
ओमी कलानी यांची पत्नी पंचम ओमी कलानी ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षा आहेत. मात्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी मैत्रीचे नाते असल्यान त्यांनी डॉ. शिंदेंसोबत दोस्ती का गठबंधन जाहीर केले आहे.त्यासाठी त्यांनी पाच हजार स्टिकर्स तयार केले असून त्याचे अनावरण डॉ.शिंदे यांच्या हस्ते केले. याशिवाय डॉ. शिंदे यांच्या प्रचारासाठी दोन प्रचार रथ केले आहेत.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.