Mumbai News: काँग्रेससह विरोधकांकडून नेहमीच भाजपचं सरकार जर बहुमताने पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलणार असल्याचा दावा केला जात आहे. हाच धागा पकडून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी देखील मोदींच्या नेतृत्वाखाली संविधान बदलण्याचा घाट घालण्यात आला असल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबेडकरांनाच प्रतिसवाल करत त्यांची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. (Prithviraj Chavan News)
लोकसभेचं बिगुल वाजण्याआधीपासून ते आजतागायत वंचित आणि काँग्रेसमध्ये दावे प्रतिदाव्यांसह कुरघोडीचं राजकारण सुरू आहेत. महाविकास आघाडीशी जागावाटपाचं गणितं फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला होणार असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केला जात आहे. यावर आता काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी (Prithviraj Chavan)देखील भाष्य केले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी (ता.4) मुंबईत मीडियाशी बोलत होते.ते म्हणाले, मोदींचं पराभव निश्चित होऊ शकतो. पण त्यासाठी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या मतांचं विभाजन टाळणं गरजेचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रकाश आंबेडकर यांनीही या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जेणेकरुन विरोधकांमधील मतांमध्ये फूट पडणार नाहीत. अन्यथा उद्या या गोष्टीमुळे भाजपचा विजय झाला आणि संविधान खरोखरच बदलले तर त्यासाठी जबाबदार कोण असणार आहे अशी विचारणा आंबेडकरांना केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, मविआ आणि वंचितची चर्चा सुरु असताना आमची आनंदराज आंबेडकर यांच्याशीही चर्चा झाली होती. ते म्हणाले होते की,अमरावतीची जागा मला द्या,मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. मात्र,त्यामुळे आंबेडकर कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाला असता.म्हणून आम्ही आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांच्यासोबत गेलो नाही असेही ते चव्हाण म्हणाले.
तसेच आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना जो निर्णय घ्यायचा आहे, तो घेऊ द्या. मात्र, आजही आमच्याकडून त्यांना सोबत येण्याचा प्रस्ताव आहे.त्यामुळे वंचितने मविआसोबत येण्याच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करावा, अशी साद पृथ्वीराज चव्हाणांनी प्रकाश आंबेडकरांना घातली.
वंचित आणि एमआयएम सारख्या पक्षांमुळे विरोधकांची मतं विभागली जातात. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात नऊ ठिकाणी वंचितमुळे भाजपचे अतिरिक्त उमेदवार निवडून आले असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.