Daund politics : सुनेत्रा पवारांसाठी कट्टर विरोधक दहा वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर!

Baramati Lok Sabha Constituency : पुणे जिल्ह्यातील विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीमधील बहुतांश नेते आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. अगदी ग्रामपंचायतीपासून विधानसभापर्यंत प्रत्येक नेत्यांचा गट आहे. त्यामुळे महायुतीच्या नावाखाली एकत्र आलेल्या नेत्यांचे मनोमिलन झाले असले तर गावपातळीवरील कार्यकर्ते एकत्र येणार का? हा खरा सवाल आहे.
Rahul kul-Sunetra Pawar- Ramesh Thorat
Rahul kul-Sunetra Pawar- Ramesh ThoratSarkarnama
Published on
Updated on

Pune, 04 April : अजित पवार हे युती सरकारमध्ये सामील झाले आणि कट्टर विरोधकांना नाईलाजाने का होईना एकाच व्यासपीठावर यावे लागले. बारामती लोकसभा निवडणुकीत तर कट्टर विरोधकांना मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात प्रत्येक निवडणुकीत लढणारे नेते नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकत्र येत आहेत. दौंड तालुक्यातील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे तब्बल दहा वर्षांनंतर राजकीय व्यासपीठावर एकत्र येत आहेत.

पुणे जिल्ह्यातील विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency ) महायुतीमधील बहुतांश नेते आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. अगदी ग्रामपंचायतीपासून विधानसभापर्यंत प्रत्येक नेत्यांचा गट आहे. त्यामुळे महायुतीच्या नावाखाली एकत्र आलेल्या नेत्यांचे मनोमिलन झाले असले तर गावपातळीवरील कार्यकर्ते एकत्र येणार का? हा खरा सवाल आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul kul-Sunetra Pawar- Ramesh Thorat
Panjabrao Dakh : पंजाबराव डख लोकसभेच्या आखाड्यात

इंदापूरमध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील विरोधात माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रेय भरणे, दौंडमध्ये माजी आमदार रमेश थोरात विरुद्ध आमदार राहुल कुल, पुरंदरमध्ये प्रा. दिगंबर दुर्गाडे विरोधात माजी मंत्री विजय शिवतारे अशा राजकीय लढाया आतापर्यंत पहायला मिळाल्या आहेत. मात्र, आता महायुतीच्या छताखाली हे सर्व नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे अख्खी हयात विरोधात लढण्यात गेलेल्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणार, याची चर्चा पुणे जिल्ह्यात रंगली आहे.

दौंडचे राजकारण हे रमेश थोरात (Ramesh Thorat) आणि राहुल कुल (Rahul Kul) यांच्याभोवतीच आतापर्यंत फिरत आलेले आहे. थोरात आणि कुल हे प्रत्येक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात. मात्र, हे नेते आता तब्बल दहा वर्षांनंतर एकत्र येत आहेत. यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीत हे नेते एकत्र आले होते.

सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर अशी बारामती लोकसभा मतदारसंघाची २०१४ मध्ये निवडणूक झाली होती. त्यावेळी तत्कालीन आमदार रमेश थोरात आणि विद्यमान आमदार राहुल कुल हे सुप्रिया सुळे यांचे काम करीत होते. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर होते. त्यानंतर राहुल कुल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून प्रथम राष्ट्रीय समाज पक्ष आणि त्यानंतर भाजपशी जुळवून घेतले. त्यामुळे गेली १० वर्षे थोरात आणि कुल यांनी तालुक्यातील सर्व निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढवल्या आहेत.

Rahul kul-Sunetra Pawar- Ramesh Thorat
Panjabrao Dakh News : आंबेडकरांचा मास्टर स्ट्रोक; परभणीतील ‘वंचित’चा उमेदवार बदलला; पंजाबराव डख यांना उमेदवारी

राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल यांनी २०१९ ची निवडणूक तर सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पण त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी राहुल कुल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली होती.

या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासाठी माजी आमदार थोरात आणि कुल यांचे कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत.

Rahul kul-Sunetra Pawar- Ramesh Thorat
Madha Lok Sabha Constituency : मोहिते पाटलांनंतर सांगोल्याचे देशमुख पवारांना भेटले; पवारांच्या मनात नेमकं काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com