Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत आमदारांचे तिकीट धोक्यात, भाजपचा वेगळाच प्लॅन

Roshan More

Loksabha Election : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 'मिशन 45' ठरवलं आहे. त्यासाठीच अजित पवार यांचा महायुतीत समावेश झाल्याची चर्चा आहेत. मात्र, अजित पवार महायुतीत असतानादेखील 'मिशन 45' होताना दिसत नसल्याने वेगळाच प्लॅन भाजपने तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या आमदारांवर जबाबदारी दिली आहे. जर जबाबदारीत कसूर झाला तर त्यांची मोठी किंमत आमदारांना चुकवावी लागणार आहे.

लोकसभेच्या उमेदवाराला आमदाराने त्याच्या मतदारसंघातून लीड द्यायचे आहे. जेवढी अधिक लीड तितके त्या आमदाराचे विधानसभेचे तिकीट पक्के. जर, लीड मिळाले नाही तर त्या आमदाराला विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळणार नसल्याच्या सूचना भाजपच्या (BJP) वरिष्ठांकडून देण्यात आल्याच्या चर्चा आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मिशन 45 साठी भाजने मित्रपक्षांवरदेखील दबाव टाकला आहे. सर्व्हेचा दाखला देत शिंदे (Eknath shinde group) गटातील विद्यमान तीन खासदारांना तिकीट नाकरण्यात आले. जागांची अदलाबदल करण्यात आली. तरीदेखील महाविकास आघाडी 20 जागांच्या आसपास पोहाेचत असल्याचे नुकत्याच आलेल्या सर्व्हेमध्ये दिसत आहे. त्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत आपल्या आमदारांना लीडविषयी सक्त सूचना केल्याचे सांगितले जात आहे.

...तर मिळणार तिकीट

ज्या उमेदवारांचा परफॉर्मन्स नाही त्या उमेदवारांना लोकसभेत तिकीट नाकारण्यात आले. हाच निकष विधानसभा निवडणुकीत भाजप लावणार आहे. त्यात जर लोकसभेला आमदाराच्या मतदारसंघात लीड मिळाले नाही तर तो आमदार डेंजर झोनमध्ये जाणार हे निश्चित. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमदरांचे टेन्शन वाढले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT