Sanjay Nirupam  sarkarnama
मुंबई

Sanjay Nirupam News : काँग्रेसचा हात सोडणाऱ्या संजय निरुपमांचं ठरलं, तब्बल 20 वर्षांनी स्वगृही परतणार

Roshan More

Loksabha Election : मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी संजय निरुपम आग्रही होते. ही जागा ठाकरे गटाला मिळाल्याने काँग्रेसवर Congress, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर उघड टीका करत संजय निरुपम यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, त्यांना भाजपमधून अंतर्गत विरोध असल्याचे देखील बोलले जात होते. अखेर आज संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आपण पुढील दोन दिवसांत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निरुपम यांनी जाहीर केले.

'तब्बल 20 वर्षानंतर आपण शिवसेनेत स्वगृही परतत आहोत. याचा आपल्याला आनंद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यासोबत आपली बैठक झाली. या बैठकीत पुढे कसं काय करायचं याची चर्चा मुख्यमंत्र्यासोबत झाली. परवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेत प्रवेश करेल', असे संजय निरुपम Sanjay Nirupam यांनी जाहीर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर पश्चिम मतदारसंघातून ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर उमेदवार आहेत. किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम यांनी किर्तीकरांवर जाहीर टीका करत घोटाळेबाजाचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस त्यांना पक्षातून निलंबीत करण्याआधीच त्यांनी आपल्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

प्रचार करणार

उत्तर पश्चिम मतदारसंघातून निरुपम निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, शिवसेनेकडून (शिंदे गट) माजी मंत्री रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करूनही संजय निरुपम यांना उमेदवारी मिळणार नाही. यावर निरुपम यांनी सांगितले की, आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतात असे नाही. मला मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती मी पार पाडील. शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा प्रचार करेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT