Sanjay Nirupam Vs MNS : उमेदवारीला मनसेचा तीव्र विरोध; निरुपम यांचं एक पाऊल मागे; म्हणाले...

Congress Political News : दोन पिढ्यांपासून काँग्रेससोबत असलेल्या नेत्यांनीच बड्या नेत्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी दिली. मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला.
Sanjay Nirupam Vs MNS
Sanjay Nirupam Vs MNSSarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीतील उत्तर पश्चिम मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी सुरु आहे.यात काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या संजय निरुपमांसह ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'करत शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेल्या रवींद्र वायकरांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.पण आता वायकर आणि निरूपम यांना महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेनं तीव्र विरोध दर्शवला आहे.आता या विरोधानंतर पुन्हा संजय निरुपम यांनी ट्विट करत मनसेला खोचक टोला लगावला आहे.

मनसेच्या (MNS) नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विटद्वारे संजय निरुपम यांना महाराष्ट्र द्रोही तर आमदार रवींद्र वायकरांना भ्रष्टाचारी म्हणत त्यांच्यासारख्या नेत्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे.तसेच अशा उमेदवारांसाठी मनसेचा पाठिंबा गृहीत धरू नका असे विधानही केले आहे. त्यामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे.यातच आता निरुपम यांनी ट्विटद्वारे मनसेला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

Sanjay Nirupam Vs MNS
Loksabha Election 2024 : पहिल्या टप्प्याचे मतदान होताच सबका साथ सबका विकास 'OUT'

संजय निरुपम Sanjay Nirupam आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, माझी सासुरवाड़ी महाराष्ट्राची आणि जावयाचे सासुरवाड़ीवर जास्त प्रेम असते. एका जावयाला का त्रास देता ? जय महाराष्ट्र !असं म्हणत मनसेसोबत सुरू असलेल्या वादात एक पाऊल मागे घेतल्याचे दिसून येत आहे.

शालिनी ठाकरे काय म्हणाल्या होत्या ?

मनसे नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी ट्विट करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.त्यांनी आपल्या ट्विटमध्ये निरूपम यांचा महाराष्ट्रद्रोही तर रवींद्र वायकर यांचा भ्रष्टाचारी असा उल्लेख केला आहे.त्या म्हणाल्या, ‘मनसेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये असा इशाराही शालिनी ठाकरे यांनी दिला होता.

Summary

निरुपम, वायकरांना उमेदवारीची शक्यता...

दोन पिढ्यांपासून काँग्रेससोबत असलेल्या नेत्यांनीच बड्या नेत्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी दिली. मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला.यानंतरही काँग्रेसला धक्क्यावर धक्के सुरू आहेत.

संजय निरुपम आणि राजू वाघमारे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसची राज्यात चांगलीच पडझड झाली आहे.निरूपम हे शिंदे गटात प्रवेश करुन असून त्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

Sanjay Nirupam Vs MNS
Amit Shah : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अमित शाहांना विसर; फडणवीसांमुळे महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com