Sanjay Raut News : 'अजित पवार दैवत बदलणार', संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

Ajit Pawar : शिंदे गट, अजित पवार गट लाचार झाले आहेत. चार जूनला सरकार बदलेल. तेव्हा मोदी नसतील आणि अजित पवारांना ईडीची नोटीस येईल, असे संजय राऊत म्हणाले
sanjay raut, ajit pawar
sanjay raut, ajit pawarSarkarnama

Loksabha Election : ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत महायुतीत सहभागी झाले. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढत आहेत. या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी आपण शरद पवार Sharad Pawar यांना दैवत मानतो होतो, असे वक्तव्य केले आहे. तर, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चार जुनच्या निकालानंतर भाजपला साथ देणारे अजित पवार आपले दैवत बदलतील, असा दावा केला आहे. त्यामुळे अजित पवार भाजपची साथ सोडणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

sanjay raut, ajit pawar
Naresh Mhaske News : 'आमचे काम 365 दिवस सुरू त्यामुळे भीती वाटत नाही', नरेश म्हस्के यांची पहिली प्रतिक्रिया !

शिंदे गट, अजित पवार Ajit Pawar गट लाचार झाले आहेत. चार जूनला सरकार बदलेल. तेव्हा मोदी नसतील आणि अजित पवारांना ईडीची नोटीस येईल. त्यावेळी अजित पवारांनी दैवत बदलेले असेल, असा दावा संजय राऊत Sanjay Raut यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार यांच्यावर पुण्यातील सभेत नरेंद्र मोदी यांनी भटकीत आत्मा असे नाव न घेता जहीर टीका केली होती. शरद पवारांनी देखील या टीकेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आपला आत्मा अस्वस्था असल्याचे म्हटले होते. मोदींच्या टीकेनंतर अजित पवारांवर टीका करण्यात येत होती. अजित पवार म्हणाले, भटकती आत्मा पंतप्रधान मोदी कोणाला म्हणाले हे आपण पुढील सभेत त्यांना विचारणार आहे.

भाजपचे योगदान काय?

संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचे स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता. महाराष्ट्राशी देखील त्यांना काही देणेघेणे नाही. महाराष्ट्रातील कोणत्या लढाईत त्यांना सहभाग घेतला ते दाखवा? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देखील भाजप नव्हता,असे संजय राऊत म्हणाले.

sanjay raut, ajit pawar
Ravikant Tupkar News :शिंदे गटाच्या आमदाराची 'तुपकरांची शिकार करू' ही धमकी; गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com