Maha Vikas Aghadi Sarkarnama
मुंबई

MVA Maharashtra : 'वंचित'चा समावेश; पण 'मविआ' नेत्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन!

Maha Vikas Aghadi Meeting In Mumbai : महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर नेत्यांचे चेहरे मात्र चिंताग्रस्त होते?

सरकारनामा ब्यूरो

Maha Vikas Aaghadi and Vanchit Bahujan Aghadi News :

महाविकास आघाडीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख आणि माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. तर शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यासह Sanjay Raut हे बैठकीला उपस्थित होते. जवळपास चार तास ही बैठक चालली. बैठकीनंतर या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी या नेत्यांचे चेहरे चिंताग्रस्त दिसून आले. यामुळे बैठकीत नेमकं काय झालं? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांची महत्त्वाची बैठक आज सकाळपासून सुरू झाली. आज बरेचशे निर्णय झालेले आहेत. अत्यंत सकारात्मक आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे महाविकास आघाडीचा विस्तार झालेला आहे. सीपीआय, सीपीआयएम, शेतकरी कामगार पक्ष, आप, संयुक्त जनता दल, समाजवादी पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी या सर्वांचा समावेश महाविकास आघाडीत केलेला आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी व्यवस्थित चर्चा झाली. महाविकास आघाडी ही अधिक बळकट झाली आहे. आघाडीत नवीन मित्र आले आहेत, असे राऊत म्हणाले. वंचित आघाडीचे तीन प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीसाठी पाठवले होते. हे नेते आमच्यासोबतच बैठकीला बसले होते. त्यांनी आमच्यासोबत जेवणही केलं. चांगली चर्चा. तसेच महाविकास आघाडीत समावेशाबाबत त्यांना जे पत्र हवे होते तेही आम्ही त्यांना दिलेले आहे. येत्या 2 फेब्रुवारीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वंचितच्या नेत्यांमध्ये कुठलीही नाराजी नसल्याचे राऊत म्हणाले.

जागावाटपावरून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. जागावाटपावरील चर्चा सकारात्मकतेने पुढे जात आहे, असे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT