mahak chaudhary  Sarkarnama
मुंबई

Mahak Chaudhary: महादेव जानकर अभिनेत्रीला करणार आमदार? 'या' मतदारसंघातून मैदानात

Mahak Chaudhary join Mahadev Jankar Rashtriya Samaj Paksha: राष्ट्रीय समाज पक्षात आता दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेत्री महेक चौधरी हीने एन्ट्री केली आहे. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात तीने प्रवेश केल्यानंतर तिची रासपच्या मुंबई अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: लोकसभा निवडणुकीची महाविकास आघाडीकडून पराभूत झालेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) हे महायुतीतून बाहेर पडले आहे. विधानसभेच्या सर्व जागा लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. रासपच्या उमेदवारांच्या पहिली यादी जाहीर झाली आहे. महादेव जानकर यांनी महायुती आणि महाविकास आघाडीला थेट आव्हान देत दंड थोपटले आहे.

लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत आपल्या पक्षाला महायुतीत चांगल्या जागा मिळतील, अशी आशा जानकर यांना होती. पण त्यांची निराशा झाली. त्यामुळे त्यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पक्षातून अनेक जण इच्छुक असून लवकरच दुसरी यादी प्रसिद्ध होणार आहे.

महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असं लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षात आता दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेत्री महेक चौधरी हीने एन्ट्री केली आहे. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात तीने प्रवेश केल्यानंतर तिची रासपच्या मुंबई अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. सोशल मीडियावर महेक हीने पोस्ट शेअर करीत निवडणूक लढण्यासाठी इच्चुक असल्याचे संकेत दिले आहेत.ती वर्सोवा मतदार संघातून ती निवडणूक लढण्यास इच्छुक आहे.

कोण आहे महक चौधरी?

  1. महेकची अनेक गाणी ही सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत असतात. तिचे सोशल मीडियावरही तिचे लाखो फॉलोअर्स आहेत

  2. मूळची उत्तर प्रदेशची असलेल्या महेकने दाक्षिणात्य सिनेमातून तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.

  3. महेकने 2015 मध्ये महेकने तिचा पहिला सिनेमा केला जो दाक्षिणात्य होता. त्यानंतर महेकने बॉलिवूडमध्येही एन्ट्री घेतली. .

  4. क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया सारख्या टीव्ही शोमधून तिने अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

  5. महकचे 'इक्श ना होना था' हे गाणे प्रचंड गाजले होते. यूट्युबवर या गाण्याला चाहत्यांनी चांगली पसंती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT