Ajit Pawar, Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणारच ! संजय राऊतांचा 'बाँब'

State Government : 'वर्षा'बाहेरील फलकामुळे शिंदे गोटात अस्वस्थता

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये उलथापालथ होण्याचे संकेत देत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला. राऊतांच्या या भाकिताने राजकीय वर्तुळात काहीशी खळबळ उडाली असली तरी राऊतांनी हे विधान शिंदे-फडणवीसांना डिवचण्यासाठी केल्याची चर्चाही आहे.

भावी म्हणजे फार काळ नाही तर काही दिवसातच पवार मुख्यमंत्री असतील, असा दावाही राऊत यांनी केल्याने सरकार गटातील आमदारांच्या पोटात गोळा आला आहे. एका वर्षातच दोन पक्ष फुटले असून आता राऊतांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात आणखी किती 'ट्विस्ट' अनुभवावे लागणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Latest Political News)

शिंदे-फडणवीस-पवारांच्या महायुतीचे सरकारवर खासदार राऊत विविध मुद्द्यांवरून टीका करत असतात. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवास्थानाबाहेर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा फलक लागला आहे. या फलकामुळे खासदार राऊतांना एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जाणाऱ्या सरकारला डिवचण्याचे आयती संधीच मिळाली. यावेळी आता राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

Banners in front of Varsha Bangalow

खासदार राऊत म्हाणाले, "मलाही राजकारण माहिती आहे. राज्यात घडणाऱ्या घटनांच्या पडद्यामागील घडामोडींची मला माहिती असते. मग त्या कायदेशीर, राजकीय किंवा घटनात्मक असो. त्यामुळे अजित पवार हे भविष्यात मुख्यमंत्री होतील. अजितदादांच्या वाढदिवसाला असे बॅनर लागले असतील तर हे सत्य शिंदे गटाने लवकर स्वीकारले पाहिजे."

फलकाबाबत बोलताना राऊतांनी अजित पवार काहीच दिवसातच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावाही केल्याने शिंदेंच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. राऊत म्हणाले, "मी खात्रीने सांगतो की, अजित पावर हे भावी मुख्यमंत्री आहेत. भावी म्हणजे फार भावी नाही तर लवकरच ते मुख्यमंत्री होणार आहेत. महाराष्ट्राला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळेल."

वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आणि अलिकडेच अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अशातच आता खासदार राऊत यांच्या विधानाने राज्याच्या राजकारणात पुन्हा वादळ येणार का ? अशी चर्चा जनतेमध्ये सुरू झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT