Breaking News : खडसेंनी फैलावर घेताच...झाली केळी महामंडळाची घोषणा!

Horticulture Minister Sandipan Bhumre made Announcement ob Banana Corporation-फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दोन महिन्यांत केळी महामंडळाच्या स्थापनेची घोषणा केली.
Sandipan Bhumare & Eknath Khadse
Sandipan Bhumare & Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Banana Corporation News : केळी उत्पादकांच्या प्रश्नांसह निर्यात व अन्य समस्या सोडविण्यासाठी येत्या दोन महिन्यात केळी विकास महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा आज फलोत्पादन विकास मंत्री संदीपान भुमरे यांनी विधान परिषदेत केली. (Eknath Khadse Crossed Minster on word of `as early`means what)

मंत्र्यांच्या उत्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) गटनेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी `लवकरात लवकर` या शब्दाला आक्षेप घेतला. त्याला काही कालमर्यादा आहे की नाही?, असा आक्षेप घेतल्याने केळी उत्पादकांसाठी (Jalgaon) झाला महत्त्वाचा निर्णय.

Sandipan Bhumare & Eknath Khadse
Raju Shetti On Tomato Price: दर पाडण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला?

केळी उत्पादक तसेच निर्यातीसह अन्य अडचणींच्या प्रश्नांबाबत आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी आज विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना फलोत्पादन मंत्री भुमरे यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ असे उत्तर दिले.

या उत्तराने समाधान न झाल्याने त्यात श्री. खडसे यांनी मंत्र्यांच्या उत्तराला आक्षेप घेतला. २०१४ मध्ये देखील असेच उत्तर मिळाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवक केळी माहमंडळ स्थापन केले जाईल असे सांगितले होते. आज २०२३ उजाडले आहे. लवकरात लवकर काहीच झाले नाही.

Sandipan Bhumare & Eknath Khadse
NCP Crisis Sinnar: `राष्ट्रवादी` सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटेंना आव्हान देईल?

श्री. खडसे पुढे म्हणाले, मी मंत्री असताना यावर खुप काम केलेले होते. यासंदर्भात जळगाव जिल्ह्यात ममुराबाद येथे ५४ एकर जागा उपलब्ध करण्यात आलेली आहे. हिंगोना (यावल) येथी जमीन देखील केळी महामंडळासाठी राज्य शासनाच्या नावावर वर्ग करण्यात आलेली आहे. अन्य आवश्यक तयारी देखील केलेली होती. त्यामुळे केव्हा करणार हे स्पेसीफीक सांगा, असे मंत्र्यांना विचारले.

Sandipan Bhumare & Eknath Khadse
Devendra Fadnavis favorite food : अमृतावहिनी खरं काय ? देवेंद्रजी म्हणतात, पुरणपोळी नाही तर 'हा' पदार्थ आवडतो !

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रणजीतसिंह मोहिते पाटील, सुरेश धस यांनी देखील चर्चेत भाग घेतला. या प्रश्नावर सदस्यांच्या भावनी तीव्र असल्याचे लक्षात घेऊन मंत्र्यांनी दोन महिन्यात महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com