Maharashtra Assembly Election 2024 : "भाजपसोबत जाण्यासाठी झालेल्या बैठकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उद्योगपती गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह मी देखील हजर होतो." असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं होतं.
त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांचा 2019 मधील पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आला होता. शिवाय यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. अशातच आता सत्तास्थापनेच्या बैठकीत उद्योगपती गोतम अदानी हे उपस्थित नव्हते असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
तसंच शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सत्तास्थापनेची रणनीती ठरल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. फडणवीस म्हणाले, "11 नोव्हेंबर 2019 मध्ये मला शरद पवार यांचा फोन आला होता. 'अजित पवारांना तुमच्याकडे पाठवतो', असं त्यांनी मला सांगितलं होतं.
या बैठकीला शरद पवार आणि अमित शाह (Amit Shah) यांच्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. मात्र ही बैठक अदानी यांच्या निवास्थानी झाली नाही आणि ते या बैठकीलाही उपस्थित नव्हते." असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे.
अजित पवारांनी (Ajit Pawar) एका मुलाखतीत म्हटलं होत की, "राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं सरकार राज्यात आणण्यासाठी दिल्लीमध्ये चर्चा झाली होती. पहाटेच्या शपथविधीपूर्वी झालेल्या बैठकीला शरद पवार आणि गौतम अदानीसुद्धा हजर होते. मात्र ऐनवेळी शरद पवारांनी निर्णय बदलल्यामुळे सर्व दोष माझ्यावर आला." दरम्यान अजितदादांनी अदानी भाजप-राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित नव्हतेच असा घुमजाव केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.