Devendra Fadnavis : फडणवीस CM पदाच्या शर्यतीत नाहीत? स्वत:चं सांगितलं म्हणाले, "घटक पक्षांना…"

Fadnavis on CM position and alliance partners: दोनच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी "महायुतीत मुख्यमंत्रि‍पदासाठी नवी नावंही समोर येऊ शकतात", असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री कोण? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Elections 2024 : "घटक पक्षांना बरोबर घेऊन जायचं असेल, तर सर्व आकांक्षा पूर्ण होतीलच असं नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही"; असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

टाइम्स ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. महत्वाची बाब म्हणजे दोनच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी "महायुतीत मुख्यमंत्रि‍पदासाठी नवी नावंही समोर येऊ शकतात", असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री कोण? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं.

अशातच आता खुद्द फडणवीस यांनी आपण या शर्यतीत नसल्याचं जाहीर केल्यामुळे तावडेंचा दावा खरा ठरणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. तर यावेळी त्यांनी 2019 च्या विधानसभेपेक्षा यंदाच्या निवडणुकीत जास्त जागा येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "आघाडी किंवा महायुतीचे राजकारण वास्तवावर आधारित असते, तिथे भावनेला प्राधान्य देता येत नाही. घटक पक्षांना बरोबर घेऊन जायचं असेल, तर सर्व आकांक्षा पूर्ण होतीलच असं नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची कोणतीही शर्यत नाही शिवाय अशा शर्यतीत मी सहभागी नाही."

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devendra Fadnavis : "80 टक्के मराठा हिंदुत्ववादी, मला खलनायक ठरवलं तरीही...", विधानसभेबाबत फडणवीसांचं मोठं विधान

विनोद तावडे काय म्हणाले?

विनोद तावडे म्हणाले, "महायुतीत (Mahayuti) मुख्यमंत्रि‍पदासाठी नवी नावंही समोर येऊ शकतात. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये जो प्रयोग करण्यात आला तसाच प्रयोग महाराष्ट्रात होऊ शकतो.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
PM Modi in Mumbai: पंतप्रधान मोदींचं 'शिवतीर्थ'वरुन उद्धव ठाकरेंना चॅलेंज; म्हणाले 'एकदा तरी राहुल गांधींच्या...'

तसंच निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह भाजपचे केंद्रीय नेतृत्व चर्चा करून मुख्यमंत्रि‍पदाबाबतचा निर्णय घेतील. राज्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवलं जाईल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com