Mumbai News : मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार यामिनी जाधव आणि शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मनोज जामसुतकर यांच्यात दुहेरी लढत रंगली आहे.
जामसुतकर यांच्या प्रचार रॅलींना मिळणारा प्रतिसाद पाहता या दोघांमध्ये चुरशीची लढत होईल, असे दिसत आहे.
मतदानाला अवघे चार दिवसच शिल्लक असल्याने प्रचार फेरी, मतदारांच्या भेटीगाठी यावर सर्वांनी लक्ष केंद्रीत केलेले आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा उत्साह देखील शिगेला पोचला आहे. मी तळागाळातील कार्यकर्ता असून विभागातील समस्यांची जाण आहे. त्यामुळे मतदानाच्या (Voter) दिवशी मााझ्या कामाची पोचपावती जनता देईल, असा विश्वास जामसुतकर यांनी व्यक्त केला.
भायखळा विधानसभा मतदारसंघात मराठी आणि मुस्लिम लोकवस्ती असून गेल्या विधानसभेत यामिनी जाधव या निवडून आल्या होत्या. यंदाच्या रणधुमाळीत दोन्ही उमेदवारांच्या प्रचार सभेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वीच्या 2012च्या महापालिकेच्या निवडणुकीत (Election) मनोज जामसुतकर निवडून आले होते. त्यानंतर विभागात त्यांनी अनेक कामे मार्गी लावली होती. त्यानंतर 2017च्या निवडणुकीत त्यांचा वाॅर्ड महिला आरक्षित झाल्यामुळे तिथून त्यांच्या पत्नी सोनम जामसुतकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्या निवडूनही आल्या होत्या.
केलेली विकासकामे, प्रचारादरम्यान घराघरातून नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद, मुस्लिम समाजाचा पाठिंबा यामुळे यामिनी जाधव यांच्यासमोर जामसुतकर यांचे तगडे आव्हान असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भायखळा 2019 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला. भायखळा हा महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनच्या वारिस युसूफ पठाण यांचा 20 हजार 23 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरविंद गणपत सावंत यांनी मुंबई दक्षिण लोकसभा (एमपी) मतदारसंघातून शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव यांचा 52 हजार 673 मतांनी पराभव करून विजय मिळवला. आता विधानसभा निवडणुकीला पुन्हा या मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.