Mahayuti Vs MVA : मागाठाण्यात शिवसेनाविरुद्ध शिवसेना रंगतदारस्थितीत; प्रकाश सुर्वेंची मोठ-मोठाली आश्वासने

ShivSenaUBT party Eknath Shinde MNS Mumbai Magathane constituency : मुंबईच्या मागाठाणे मतदारसंघात महायुतीमधील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मविआतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील लढाई रंगतदारस्थितीत पोचली आहे.
Mahayuti Vs MVA
Mahayuti Vs MVA Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईतील मागाठाणे मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा प्रचार शिगेला पोचला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजूने वेगवेगळी आश्वासने दिली जात आहेत.

महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार प्रकाश सुर्वे यांनी देखील मतदारांना मोठ-मोठाली आश्वासने देणं सुरू केले आहे.

आमदार प्रकाश सुर्वे गेली दोन टर्म इथं आमदार आहेत. यावेळी त्यांना हॅटट्रिकची तयारी केली आहे. यासाठी ते मतदारसंघ पिंजून काढत आहे. परंतु त्यांना महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे उमेदवार उदेश पाटेकर आणि मनसेचे नयन कदम यांचेही आव्हान मिळाले आहे. त्यामुळे मागाठाणे मतदारसंघात तिरंगी लढतीची चिन्हं आहेत.

Mahayuti Vs MVA
Shetkari Kamgar Party : शेकापचे प्रितम म्हात्रेंचा शिक्षणसम्राटांना इशारा; महाराष्ट्र मच्छिमार सेनेचा मोठा निर्णय

प्रकाश सुर्वे यांनी वन विभागाच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांना आणि रहिवाशांना अनेक सोयीसुविधा आपण मिळवून दिल्या आहेत. त्यांचे उरलेले सर्व प्रश्न आपण आता सोडवणार आहोत, असे आश्वासन देत आहेत. महायुतीमधील (Mahayuti) भाजप, आरपीआय आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी प्रचारात सहभागी झाले आहेत. 'सरकारच्या जनहितकारी योजनांमुळे, मग ती लाडकी बहीण योजना असो वा एसटीमध्ये महिलांना अर्धे तिकीट असो, या चांगल्या उपक्रमांमुळे महिलांचा पाठिंबा महायुती सरकारला नक्कीच मिळेल', असा विश्वास सुर्वे व्यक्त करत आहेत.

Mahayuti Vs MVA
Manoj Tiwari : ठाण्यातील सभेत अभिनेता मनोज तिवारी यांची तुफान फटकेबाजी

मागाठाणे मतदारसंघात मराठी मतदारांचे प्राबल्य आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर इथली राजकीय गणिते बदलली आहेत. प्रकाश सुर्वेंसमोर ठाकरे गटाच्या उदेश पाटेकर यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. मनसेच्या नयन कदम यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात त्यांची हवा निर्माण केली आहे. त्यामुळे इथं तिरंगी पारडे जड आहे. असे असले तरी या मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत पाहायला मिळेल, असेच जास्त चित्र आहे.

मूळ शिवसैनिक नाराज

मागाठाणे विधानसभा मतदारसंघ हा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. यात दहिसरमधील अशोक वन, नॅन्सी कॉलनी व इतर काही भागांचा समावेश आहे. बोरिवलीतील टाटा पावर, देवी पाडा, त्रिमूर्ती, कुलुपवाडी हा विभाग येत असून, मराठी मतदार जास्त आहे. राजकीय समीकरण बदलल्याने येथील मूळ शिवसैनिक नाराज असल्याचे पाहायला मिळते. शिवसेनेची पारंपरिक मते असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता जास्त आहे.

कांटे की टक्कर

या मतदारसंघात गुजराती मतदारही आहेत. शिवसेना ठाकरे गटाला मानणारा गुजराती वर्गही या मतदारसंघात पाहायला मिळतो. याशिवाय मुस्लिम व परप्रांतीय मते महाविकास आघाडीला मिळणार असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षविरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष यांच्यात कांटे की टक्कर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com