Rahul Narwekar Sarkarnama
मुंबई

Maharashtra Assembly Speaker : मोठी बातमी! राहुल नार्वेकरांना पुन्हा विधानसभा अध्यक्षपदाची 'लॉटरी' लागणार?

Rahul Narwekar News : शिवसेनेतील बंडानंतर आघाडी सरकार कोसळून शिंदे आणि भाजपचं सरकार स्थापन झालं होतं. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष भाजपनं आपल्याकडं घेत त्यावर राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड केली होती.

Deepak Kulkarni

Maharashtra News : ऐतिहासिक आणि तितकंच विक्रमी बहुमत मिळवत महाराष्ट्रात महायुती विजयी झाले. पण निकाल लागून 10 दिवस उलटल्यानंतरही महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला नव्हता.त्यामुळे विरोधकांसह सर्वसामान्यांच्या मनातही शंकांनी जोर धरला होता. पण आता महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तापेच सुटल्यात जमा आहे. एकीकडे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी (ता.5) आझाद मैदानावर होत आहे. तर दुसरीकडे आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली असून तेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर आता महायुतीच्यावतीने भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीनही पक्षांच्या प्रमुखांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यातच आता विधानसभा अध्यक्षपद कुणाकडे राहणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

याचवेळी विधानसभा अध्यक्षपद पुन्हा एकदा महायुतीत भाजपकडेच राहण्याची मोठी शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतरच्या प्रकरणात नार्वेकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. आता बहुमतात सत्तेत परत आल्यानंतर महायुती आणि भाजपकडून नार्वेकरांनाच विधानसभा अध्यक्ष म्हणून संधी देण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळून महाराष्ट्रात शिंदे आणि भाजपचं सरकार स्थापन झालं होतं. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष भाजपनं आपल्याकडं घेत त्यावर राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड केली होती. शपथविधी सोहळ्यानंतर विधानसभेच्या सभागृहात महायुती नव्या सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडावा लागणार आहेत. तसेच आमदारांचा शपथविधी सोहळा, विधानसभा अध्यक्षांची निवड यासाठी राज्यपालांकडून विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे.

विधानसभेच्या या विशेष अधिवेशनातच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागेल. त्यासाठी 7,8 आणि 9 डिसेंबरला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावलं जाणार असल्याची माहिती आहे. यात 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपला 132, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 57 आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला 41 जागांवर विजय मिळाला. मित्रपक्षांसह महायुतीचं संख्याबळ 236 इतकं झालं आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं आणि भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष भाजपनं त्यांच्याकडे घेतलं होतं. भाजपनं त्यावेळी राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT