Devendra Fadnavis : सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर काही क्षणातच फडणवीसांनी मानले शिंदेंचे आभार; 'हे' आहे कारण

Devendra Fadnavis on Eknath Shinde : राज्यपाल यांच्याकडून उद्याच्या शपथविधीला परवानगी मिळाली आहे. उद्या किती लोकांचा शपथविधी होईल याची माहिती संध्याकाळी दिली जाईल.
Devendra Fadnavis | Eknath Shinde
Devendra Fadnavis | Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी(ता.5) होत आहे.देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर आता महायुतीच्यावतीने सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. महायुतीच्या वतीने राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना पत्र दिले आहे. त्यानंतर झालेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

महायुतीच्या राजभवनात पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येत असलेल्या महायुतीच्या सरकारची भूमिका मांडली. तसेच यावेळी त्यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंबंधीही मोठं विधान केलं. तसेच शिंदे आणि अजितदादांना धन्यवाद दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले,महायुतीच्यावतीने राज्यात सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलं आहे. राज्यपालांनी आम्हाला पाच तारखेला संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधीची वेळ नेमून दिली आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या तिन्ही पक्षांकडून सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

Devendra Fadnavis | Eknath Shinde
Maharashtra Govt Formation: मोठी बातमी ! महायुतीने केला राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा; एकनाथ शिंदेंनी दिले पत्र

महायुतीकडून करण्यात आला. राज्यातील सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. 234 आमदारांच्या समर्थनार्थ पत्रदेखील महायुतीकडे सोपवण्यात आले आहे. तेच महायुतीच्या सर्व आमदारांच्या सहीचे पत्रही राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

जेणेकरून फ्लोर टेस्ट दिवशी संख्याबळ स्पष्ट होईल.भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,जनसुराज्य पक्ष, युवा स्वाभिमान,रासप आणि अपक्ष अशी मोठी महायुती झालेली आहे. या सर्वांच्या सहीचे पत्र राज्यपालांना दिले आहे. मी शिंदे यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी मला मुख्यमंत्री करावा, असे पत्र राज्यपालांना दिले आहे.

Devendra Fadnavis | Eknath Shinde
Kolhapur Politics: देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' बंद लिफाफ्यात कुणाचं नाव? महाडिक की कोरे

अजित पवारांनी त्याच आशयाचे पत्र देऊन मुख्यमंत्री म्हणून माझ्यासाठी पत्र दिले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या सोहळा पार पाडला जाणार आहे. तिन्ही पक्षाचे नेते असणार आहे. राज्यपाल यांच्याकडून उद्या शपथविधीची वेळ केली निश्चित करण्यात आली आहे.

राज्यपाल यांच्याकडून उद्याच्या शपथविधीला परवानगी मिळाली आहे. उद्या किती लोकांचा शपथविधी होईल याची माहिती संध्याकाळी दिली जाईल. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री हे तांत्रिक अडचण आहे. मात्र, आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतो. शिवसेनेच्यावतीने शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावं अशी विनंती केली. त्यामुळे त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. आम्ही जी आश्वासने दिली आहेत, ती सर्वप्रकारे पूर्ण करू असा विश्वास व्यक्त करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com