Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे; महायुती सरकारचे बजेट 28 तारखेला

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Assembly Session News :

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात 28 तारखेला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. राज्यातील वाढत्या राजकीय घडामोडींमुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद राज्यात सुरू आहे. दुसरीकडे गुन्हेगारांसोबतच्या फोटोवरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचे प्रकरण ताजे आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. यासह एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. तसेच अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि नाव मिळाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसमध्येही फूट पडणार, अशी चर्चा आहे. यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीला सुरू होईल. पहिल्या दिवशी विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण, त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सादर केला जाईल. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. 2023-24 च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर शासकीय कामकाजाला सुरुवात होईल.

28 फेब्रुवारीला शासकीय कामकाजाला सुरुवात होईल. त्यानंतर 2024 -25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा करण्यात येणार आहे.

edited by sachin fulpagare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT