Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (बुधवारी) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात तासभर महत्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे.
खातेवाटपाचा तिढा सुटला असल्याचे समजते. अमित शाह यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा निघाल्याचा अंदाज आहे. अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल हेही होते. तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गैरहजेरीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी हा तिढा सोडवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
शिंदे गटाकडून अनिल बाबर, भरत गोगावले आणि योगेश कदम यांना मंत्रिपदे मिळणार असल्याचं अमित शाह यांच्या बैठकीत ठरल्याची चर्चा आहे. एनडीएच्या घटक पक्षांची बैठक 18 जुलै रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.
सुमारे दीड वर्षांपासून राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत रोज नवीन तारीख समोर येत आहेत. सध्या याबाबतच्या घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजभवनात तयारी सुरु आहे. मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच समजेल.
आणखी दोन मंत्रीपदे
नव्या फार्म्युल्यानुसार भाजपला चार, शिंदे गटालाही चार , तर राष्ट्रवादीला दोन मंत्रिपद मिळणार आहेत. म्हणजे एकूण 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे समजते. नव्या फॉर्म्युलानुसार भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी चार मंत्रिपद मिळणार आहेत. या दोन्ही गटाचे आधीच मंत्रिमंडळात प्रत्येकी 10 मंत्री आहेत. दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांची संख्या प्रत्येकी 14 होणार आहे. राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळात 9 मंत्री आहेत. त्यांना आणखी दोन मंत्रीपदे मिळणार असल्याने त्यांच्या मंत्र्यांची संख्या 11 होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.